हसन मुश्रीफ
हसन मुश्रीफsakal

हसन मुश्रीफ : विश्वासाने विश्व निर्माण करणारा नेता

राजकारण व समाजकारण याचा समन्वय राखत दीनदलित शेतकऱ्यांचे हित पाहणारा नेता

सामाजिक बांधिलकी पत्करून समाजाच्या हिताचा दृष्टीकोन डोळ्यांसमोर ठेवून गोरगरीब, भोळ्याभाबड्या जनतेच्या उन्नतीसाठी अहोरात्र धडाडीने व निरपेक्षपणे विकासाचे व्रत जोपासून राजकारण व समाजकारण याचा समन्वय राखत दीनदलित शेतकऱ्यांचे हित पाहणारा आमचा नेता. विकासकामे करताना कोणत्याही पोकळ गप्पा, चर्चा केल्या नाहीत. आधी केले, नंतर सांगितले या उक्तीप्रमाणे ते काम करत राहिले. आमच्यासारखे अनेक सच्चे कार्यकर्ते त्यांनी तयार केले आहेत. या त्यांच्या प्रेरणेने त्यांच्याभोवती अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांची मोठी फळी निर्माण झाली आहे. कार्यकर्त्यांच्या सुखदुःखात साहेब नेहमीच सहभागी होतात. त्यांना माणसांची पारख अचूक आहे. त्यांचे विविध क्षेत्रांतील योगदान सर्वच थरांतील लोकांना आधाराचे वाटते. त्यांच्या दृष्टिकोनामुळेच फक्त कागल तालुका नव्हे, तर त्यांनी कोल्हापूर जिल्हाच सुजलाम सुफलाम बनवला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाने अनेक लहान माणसे मोठी झाली आहेत.

साहेब महिला सबलीकरणासाठी प्रयत्नशील असणारे खरे नेतृत्व आहे. ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून महिला बचत गटासाठी त्यांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे अनेक महिलांच्या हाताला काम मिळाले आहे. अनेक शासकीय योजनांचा लाभ महिलांना मिळवून देण्यासाठी ते नेहमी मोठ्या भावाप्रमाणे धावून जातात. साहेबांच्या दारी गेलेल्या कोणत्याही महिलेला त्यांनी निराशेने परत पाठवलेले नाही. स्वतः कार्यकर्त्यांच्या गराड्यात असतानाही एखाद्या प्रसंगी कोणत्याही महिलेवर अन्याय होणार नाही याची ते नेहमी काळजी घेत असतात. अशा या नेत्याला, आमच्या मोठ्या भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
- शीतल रोहित फराकटे, जिल्हाध्यक्षा, महिला राष्ट्रवादी काँग्रेस, कोल्हापूर. सरपंच, ग्रा. पं. फराकटेवाडी (ता. कागल)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com