शहापूरच्या विकास सेवा सोसायटीमध्ये १० बिनविरोध तर केवळ २ जागांसाठी लढतीत वर्चस्व | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शहापूरच्या विकास सेवा सोसायटीमध्ये १० बिनविरोध तर केवळ २ जागांसाठी लढतीत वर्चस्व
शहापूरच्या विकास सेवा सोसायटीमध्ये १० बिनविरोध तर केवळ २ जागांसाठी लढतीत वर्चस्व

शहापूरच्या विकास सेवा सोसायटीमध्ये १० बिनविरोध तर केवळ २ जागांसाठी लढतीत वर्चस्व

sakal_logo
By

शहापूरच्या हनुमान
विकास सोसायटीत
१० जण बिनविरोध

बोरपाडळे, ता. २४ : शहापूर (ता.पन्हाळा) येथील श्री.हनुमान विकास सेवा सोसायटीची निवडणूक केवळ २ जागांसाठी झाली. यापूर्वीच समजुतीने राजेंद्र कडवेकर, जितेंद्र पाटील, चंद्रकांत कडवेकर, बळीराम आभ्रंगे, संभाजी जाधव, तानाजी पाटील, जितेंद्र शेटे, रघुनाथ कापसे, सुभाष पाटील,तानाजी कळंत्रे यांची बिनविरोध निवड झाली होती; पण एक अपक्ष उमेदवार रिंगणात राहिल्याने निवडणूक लागली. २ जागांसाठी ३८४ पैकी ३३७ मतदारांनी हक्क बजावत रंजना निंबाळकर, कल्पना पाटील यांना निवडले. निकालानंतर गुलालाची उधळण व घोषणाबाजीने परिसर दुमदुमला. निवडणूक निर्णय अधिकारी व्ही.पी. मटटीमणी यांच्या मार्गदर्शनाखाली सुनिल बिळासकर, बाबासाहेब सामुद्रे यांनी काम पाहिले. यावेळी कोडोली पोलिस ठाण्याचे हवालदार विश्वास चिले, एच. के. उपलवाड यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top