
महिला, मुलींनी निर्भय बनावे
01942
महिला, मुलींनी निर्भय बनावे
इंदुरीकर महाराज; खोचीमध्ये कीर्तन
खोची, ता. ८ : आजच्या तरुण पिढीला विज्ञानाबरोबरच अध्यात्माचे शिक्षण दिले तरच संस्कारक्षम पिढी घडेल. महिला व मुलींनी समाजातील वाईट प्रवृत्तीविरुद्ध उभे राहून निर्भय बनले पाहिजे. तरुणांना इंटरनेटच्या युगातही गीतेचे श्लोक येणे गरजेचे आहे. वारकरी संप्रदाय हा चांगल्या भक्तीचा व आदर्शत्वाची शिकवण देणारा संप्रदाय आहे, त्यांच्या संगतीत राहून भवितव्य उज्ज्वल करा. व्यसनाधीनता ही समाजाला लागलेली कीड आहे. त्याला मुळासकट बाजूला करा, असे आवाहन निवृत्तीनाथ देशमुख ऊर्फ इंदुरीकर महाराज यांनी केले.
ते येथील बाळासाहेब पाटील यांच्या पुण्यस्मरणानिमित आयोजित कीर्तनाच्या कार्यक्रमात बोलत होते. भैरवनाथ मंदिराजवळ परिसरातील हजारो भाविकांनी कीर्तनाचा लाभ घेतला. जयसिंगपूर उपविभागीय पोलिस अधिकारी रामेश्वर वैंजणे, पोलिस निरीक्षक संतोष घोळवे, सुजित पाटील, संदीप पाटील, संजय पाटील उपस्थित होते. ते म्हणाले, ‘पालकांनी जबाबदारीचे भान ठेवून योग्य व अयोग्य याचे अवलोकन करून मुलींना आदर्श व्यक्तिमत्त्वाचे धडे द्यावेत. कोरोनात रस्त्यावर उभे राहून समाजाचे संरक्षण करणाऱ्या पोलिस, डॉक्टर, आरोग्यसेवक यांचे काम मोठे आहे. त्यांच्यामुळेच आपल्याला पुनर्जन्म मिळाला आहे. हे विसरता येणार नाही. शासनाच्या वतीने गावागावात ऊर्जा बचतीचे महत्त्व पटवून नैसर्गिक असणाऱ्या सौर ऊर्जेचा वापर करावा तरच कीर्तन यशस्वी झाले असे म्हणणे योग्य ठरेल.’ त्यांनी ज्ञानेश्वरीतील विविध अध्यायांतील ओवींचा संदर्भ देत प्रबोधन केले. आभार सुजित पाटील यांनी मानले.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..