निवडीबद्दल विनायक देसाईंचा सत्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निवडीबद्दल विनायक देसाईंचा सत्कार
निवडीबद्दल विनायक देसाईंचा सत्कार

निवडीबद्दल विनायक देसाईंचा सत्कार

sakal_logo
By

01615
निवडीबद्दल विनायक देसाईंचा सत्कार
पेठवडगाव, ता. २५ : येथील अशोकराव माने ग्रुप ऑफ इंस्टिट्यूशन्समधील सिव्‍हिल इंजिनिअरिंगचा विद्यार्थी विनायक देसाई यांची महाराष्ट्र शासनाच्या पाटबंधारे विभागात सहायक अभियंतापदी नुकतीच निवड झाली. स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षेमध्ये यश संपादन केल्याबद्दल त्यांचा अशोकराव माने ग्रुप तर्फे संस्थेचे अध्यक्ष विजयसिंह माने यांच्या हस्ते सत्कार केला.
विनायक देसाई यांनी मुख्य मुलाखतीदरम्यान आलेले अनुभव कथन केले. सिव्‍हिल विभागप्रमुख प्रा. जे. एम. शिंदे यांनी विभागातील विविध विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षेद्वारे शासकीय सेवेत निवड होण्याची परंपरा विषद केली. महाविद्यालयाचे संचालक डॉ. एच. टी. जाधव, विभागप्रमुख प्रा. जे. एम. शिंदे, प्रा. ए. व्ही. कार्वेकर, प्रा. एस. बी. पाटील, प्रा. जे. ए. पाटील, प्रा. एस. एस. चोकाककर, प्रा. एस. बी. खोत उपस्थित होते. मोहम्मदकदीर मुजावर याने स्वागत केले. ऋषिकेश कोळी यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top