दरेकर प्रेस कॅन्फरन्स बातमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दरेकर प्रेस कॅन्फरन्स बातमी
दरेकर प्रेस कॅन्फरन्स बातमी

दरेकर प्रेस कॅन्फरन्स बातमी

sakal_logo
By

काँग्रेस, राष्ट्रवादीचा झेंडा
घेण्याची शिवसैनिकांवर वेळ

विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची टीका

कोल्हापूर, ता. ७ ः मुख्यमंत्री पदाचा मुकूट शिवसेनेकडे आहे; पण सत्ता राष्ट्रवादी काँग्रेसच उपभोगते. शिवसेनेच्या मंत्र्यांना निधी मिळत नाहीत. आमदारांची कामे होत नाहीत. त्यामुळे नाराज आमदार, शिवसैनिक वेळोवेळी आपली खंत जाहीरपणे बोलून दाखवत आहेत. पंढरपूर, देगलूर आणि आता कोल्हापुरातही शिवसैनिकांना काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा खांद्यावर घ्यावा लागत आहे, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी केली.
येथे आज झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, ‘सत्तेसाठी उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाला सोडले आहे. सत्तेच्या मोहापायी त्यांना दहशतवाद्यांनी अर्थसहाय्य केलेल्या नवाब मलिक यांच्यासाठी रस्त्यावर उतरावे लागत आहे. मशिदीवरील भोंग्याबाबत बाळासाहेबांची भूमिका काय होती हे सर्वांना माहिती आहे. आज त्याच भूमिकेला शिवसेनेने तिलांजली दिली आहे. आम्ही शिवसेनेबरोबर २५ वर्षे काम केले आहे. हिंदुत्वाचा विचार हा दोन्ही पक्षांतील समान धागा होता; पण सेनेने हिंदुत्व सोडल्याने आता बाळासाहेबांचा विचार पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी भाजपची आहे. मात्र, शिवसेनेच्या भविष्याबद्दल चिंता वाटते. ज्या शिवसैनिकांनी भगव्यासाठी काम केले आता त्यांना महाविकास आघाडीमुळे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा खांद्यावर घेऊन प्रचार करावा लागत आहे. पंढरपूर, देगलूर आणि आता कोल्हापुरातही तेच घडत आहे. कोल्हापूर उत्तरची निवडणूकही अनेक अर्थांनी महत्त्वाची आहे. महाविकास आघाडीने गेल्या अडीच वर्षांत विकासाचे भकास चित्र उभे केले आहे. जनता हैराण आहे. आपला रोष ती मतांमधून व्यक्त करेल. त्यामुळेच या निवडणुकीत भाजपचा उमेदवार नक्की विजयी होईल. ही निवडणूक म्हणजे शितावरून भाताची परीक्षा असणार आहे.’ यावेळी भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, ज्येष्ठ नेते माधव भांडारी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..