गर्भपात स्टाईड स्टोरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गर्भपात स्टाईड स्टोरी
गर्भपात स्टाईड स्टोरी

गर्भपात स्टाईड स्टोरी

sakal_logo
By

लिंग चाचणीसाठी मुंबई, गोव्यातून पन्हाळा तालुक्यात
यादी करणार पर्दाफाश; रॅकेटसह एजंटांच्या साखळीचा शोध; सांकेतिल भाषेत लिखापढी
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ७ : जिल्ह्यासह मुंबई, गोव्यातील रुग्ण गर्भलिंग चाचणीसाठी पडळ (ता. पन्हाळा) येथे येत होते. अशी धक्कादायक माहिती घटनास्थळी सापडलेल्या यादीच्या आधारे पुढे येत आहे. या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाऊन या मागचे सत्य शोधण्याचे काम सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पडळ (ता. पन्हाळा) आणि अंबाई टँक परिसरात पोलिस, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्‍टिंग ऑपरेशन करून बेकायदेशीर गर्भपात प्रकरणाचा पर्दाफाश केला. घटनास्थळी औषधांसह गर्भपातासाठी लागणारे साहित्य आणि एक यादी पोलिसांना मिळून आली. या यादीतील नमूद मजकुरामध्ये महिना, त्यापुढे सुमारे शंभर एक महिलांची नावे आहेत. त्या नावासमोर (एम/एफ) असे लिहिले असून खाली गावाचा आणि पुढे वेगवेगळ्या रकमेचा तपशील आहे. ‘एम’ अर्थात मेल (पुरुष) ‘एफ’ अर्थात फिमेल (स्त्री) असा त्याचा बोध होतो. त्यामुळे या यादीनुसार रुग्णाची गर्भलिंग चाचणीही केली जात असल्याची शक्यता प्राथमिक तपासात पुढे येत असल्याचे सहायक पोलिस निरीक्षक श्रद्धा अबंले यांनी सांगितले.
यादीत कोल्हापूर जिल्ह्यासह, सांगली, मुंबई, गोवा अशा परराज्याचा पर्यंतचा तपशील आहे. संबधित यादी ही गर्भलिंग चाचणीची असेल तर ही यंत्रणा पन्हाळा तालुक्यापासून जिल्हा ते परराज्यापर्यंत कशी पोहचली? हा प्रकार किती वर्षे सुरू होता? त्यामागे रॅकेट आणि एजंटाची साखळी कशी करते? अशा विविध प्रश्नांचा मुळापर्यंत जावून तपास सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

परिस्थितीनुसार पैसे
घटनास्थळी प्राप्त झालेल्या यादीतील प्रत्येक महिलेच्या नावापुढे वेगवेगळ्या रकमचा तपशील लिहिण्यात आला आहे. तीन, आठ, दहा ते १४ हजारांपर्यंतच्या या रकमा नमूद आहेत. यावरून रुग्णाच्या आर्थिक परिस्थितीचा अंदाज घेऊन त्यांच्याकडून चाचणीसाठी पैशाची आकारणी केली जात असल्याचा पोलिसांकडून संशय व्यक्त केला जात आहे.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..