ईव्हीएम मशिनीच तपासणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ईव्हीएम मशिनीच तपासणी
ईव्हीएम मशिनीच तपासणी

ईव्हीएम मशिनीच तपासणी

sakal_logo
By

मतदान यंत्रांची तपासणी
शासकीय यंत्रणा गतिमान; ५१९ दिव्यांग, ज्येष्ठांचे टपाली मतदान पूर्ण
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ७ : उत्तर मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी शासकीय यंत्रणा गतिमान झाली आहे. विवेकानंद महाविद्यालयात आज मतदान यंत्रांची तपासणी केली. आज एका दिवसात १९० यंत्रे तयार झाली आहेत. उर्वरित यंत्रे उद्या तयार होतील. दरम्यान आजअखेर ६८८ पैकी ५१९ टपाली मतदान पूर्ण झाले आहे.
उत्तरसाठी ज्याप्रमाणे राजकीय धुळवड सुरू आहे, त्याच्या उलट स्थिती शासकीय यंत्रणेची आहे. मतदानयंत्र तपासणी, लोकांच्या किंवा मतदारांच्या शंका निरसण करणे याशिवाय टपाली मतदान घेण्याचे काम जोमाने सुरू आहे. सहायक निवडणूक अधिकारी कल्पना कापसे, संतोष कणसेंसह इतर अधिकाऱ्यांच्या निदर्शनाखाली यंत्रांची तपासणी झाली. राखीव एकूण ५०२ पैकी १९० यंत्रे वापरासाठी तयार आहेत. उद्या आणखी काही तयार करण्याचे नियोजन आहे. यंत्रे तयार करताना अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना डोळ्यांत तेल घालून काम करावे लागत असल्याचे चित्र आहे.
दरम्यान, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांचे टपाली मतदान घेण्याची प्रक्रियाही सुरू आहे. ६८८ पैकी आजअखेर ५१९ मतदान पूर्ण झाले आहे. रविवार (ता. १०) पर्यंत मतदान प्रक्रिया सुरू राहणार आहे. यासाठी १४ पथके काम करत आहेत. एक पथक दिवसाला १४ मतदान घेत आहे.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..