कदम टुडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कदम टुडे
कदम टुडे

कदम टुडे

sakal_logo
By

13320
स्वाभिमानाने मतदान करा
कृष्णराज महाडिक; तरूणांचा मतांचा टक्का वाढण्यासाठी अभियान

कोल्हापूर, ता. ७ ः लोकशाहीमध्ये मतदार राजा आहे. प्रत्येक मतदाराने आपला मतदानाचा पवित्र हक्क बजावला पाहिजे. निर्भयपणे मतदार करून, योग्य उमेदवार सभागृहात निवडून गेला तरच जनतेचे प्रश्‍न मार्गी लागू शकतात आणि मतदार संघाची प्रगती होवू शकते. त्यामुळे प्रत्येकाने मतदान करावे, यासाठी कोल्हापुरातील प्रसिद्ध फार्म्यूला थ्री रेसर कृष्णराज महाडिक यांनी प्रबोधन मोहीम सुरू केली आहे.
शहरातील विविध महाविद्यालयात जाऊन, युवक-युवतींना मतदान करण्यासाठी प्रबोधन केले जात आहे. राजकारण विरहित हा उपक्रम सुरू असून, त्याला तरूणाईचा प्रतिसाद मिळत आहे. कृष्णराज महाडिक यांचे व्हिडीओ ब्लॉग प्रचंड लोकप्रिय आहेत. त्यामुळे तरूण वर्गात त्यांची वेगळी क्रेझ आहे. कृष्णराज महाडिक महाविद्यालयाच्या आवारात गेले की, तरूणाईचा त्यांच्याभोवती गराडा पडतो. सध्याच्या राजकारण आणि समाजकारणाविषयी चर्चा करत कृष्णराज महाडिक मतदान करण्यासाठी प्रवृत्त करतात. जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारतातील प्रत्येक मतदाराने मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. आपल्या परिसराचा, शहराचा, राज्याचा आणि देशाचा विकास व्हायचा असेल तर योग्य व्यक्तीला मतदान करा, असे आवाहन कृष्णराज यांच्याकडून केले जाते. देशभक्त रत्नाप्पा कुंभार महाविद्यालय, न्यू कॉलेज यासह अन्य महाविद्यालयात जाऊन कृष्णराज महाडिक यांचे अभियान सुरू आहे. लोकशाही मूल्ये टिकून ठेवायची असतील, तर आधी प्रत्येकाने मतदान केलेच पाहीजे. विशेषतः तरूण वर्गाने कोणत्याही आमिषाला बळी न पडता, स्वाभिमानाने मतदान करा, असे आवाहन कृष्णराज महाडिक यांच्याकडून केले जात आहे.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..