प्राचार्य बैठक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्राचार्य बैठक
प्राचार्य बैठक

प्राचार्य बैठक

sakal_logo
By

L13326

बदलांना सामोरे जाण्यासाठी
क्षमतावर्धन आवश्यक

डॉ. डी.टी. शिर्के; विद्यापीठात प्राचार्यांची विशेष बैठक

कोल्हापूर, ता. ७ ः ‘‘नजीकच्या काळात शैक्षणिक क्षेत्राला नव्या धोरणासह अनेक बदलांना सामोरे जावे लागणार आहे. त्यासाठी महाविद्यालयांनी आपल्या क्षमता अधिक वृद्धिंगत करण्याकडे लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे,’’ असे आवाहन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी आज केले.
शिवाजी विद्यापीठात आयोजित प्राचार्यांच्या विशेष एकदिवसीय बैठकीच्या उद्‍घाटनप्रसंगी ते बोलत होते. प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील, प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे उपस्थित होते.कोविडमुळे दोन वर्षांच्या खंडानंतर प्रथमच प्राचार्यांची ऑफलाईन बैठक घेतली.
कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, ‘‘नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण केव्हाही लागू होऊ शकते. त्या दृष्टीने विद्यापीठ तयार आहे. महाविद्यालयांनीही तयारीत राहावे. धोरणापलिकडेही अनेक नवे अभ्यासक्रम, योजना, उपक्रम आणि मूल्यमापनाच्या अभिनव पद्धती विद्यापीठ अनुदान आयोगाच्या माध्यमातून येत आहेत. त्यांचा आढावा घेण्यासाठी, कार्यवाही करण्यासाठी महाविद्यालयांनी एक स्वतंत्र कक्ष निर्माण करावा. युजीसी वेगवेगळे मसुदे वेबसाईटवर ठेवते. चर्चा करून महाविद्यालयांनी मते, सूचना, अभिप्राय युजीसीला द्यायला हवीत. विद्यापीठाच्या पत्रांची वाट न पाहता विद्यापीठालाही सूचना कराव्यात. अॅकॅडेमिक बँक ऑफ क्रेडिट्समुळे (एबीसी) विद्यार्थी कोणत्याही विद्याशाखेतील असला तरी त्यांना आवडीचे अभ्यासक्रम शिकण्याची मुभा असणार आहे. विद्यार्थी अन्य ठिकाणच्या अभ्यासक्रमांकडे आकर्षिला जाणे स्वाभाविक आहे. आपणही अन्य ठिकाणच्या विद्यार्थ्यांना आवडतील, आकर्षित करतील, अशा अभ्यासक्रमांची निर्मिती करण्याची गरज आहे.’ प्र-कुलगुरू डॉ. पाटील यांनी स्वागत, प्रास्ताविक केले. कुलसचिव डॉ. शिंदे यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..