डॉ. प्रमोद सावंत सत्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डॉ. प्रमोद सावंत सत्कार
डॉ. प्रमोद सावंत सत्कार

डॉ. प्रमोद सावंत सत्कार

sakal_logo
By

१३३४१

भारताला विश्वगुरू करण्यास मोदींना साथ द्या
डॉ. प्रमोद सावंत; गोवा मुख्यमंत्रिपदी नियुक्तीबद्दल कॉलेजियन मित्रपरिवारातर्फे सत्कार
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ७ ः भारताला विश्वगुरू करणे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे. त्यासाठी सर्वांनी साथ दिली पाहिजे. त्यासाठीच अधिक सक्षमपणे कार्यरत राहीन. माझ्या नेतृत्वगुणाला खऱ्याअर्थाने कोल्हापुरातच संधी मिळाली आणि पुढे गोव्याचा आमदार आणि मुख्यमंत्री झालो. नरेंद्र मोदी यांच्या ‘आत्मनिर्भर भारत’ संकल्पनेवरच ‘स्वयंपूर्ण गोवा’ या संकल्पनेतून गोव्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज सांगितले. येथील गंगा एज्युकेशन सोसायटीच्या आयुर्वेद महाविद्यालयाचे ते माजी विद्यार्थी. गोवा मुख्यमंत्रिपदाची दुसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर त्यांच्या मित्र परिवारातर्फे आज त्यांचा रेसिडन्सी क्लबमध्ये सत्कार झाला. त्यावेळी ते बोलत होते.
मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी कोल्हापुरातील आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, ‘‘महाविद्यालयीन शिक्षणानंतर १९९६ ला कोल्हापूर सोडले; पण त्यानंतर प्रत्येक वर्षी श्री अंबाबाई आणि श्री जोतिबाचे दर्शन घेण्यास येतो. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत येथील मित्रांचीही साथ मिळाली. २०१४ पासून झालेला गोव्याचा विकास जनतेसमोर ठेवला आणि जनतेने भाजपवर विश्वास ठेवत बहुमताची पोचपावती दिली.’’
प्रदेशाध्यक्ष, आमदार चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘‘कर्तृत्व आणि नम्रतेचा सुरेख मेळ डॉ. सावंत यांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये आहे. ते उत्तम प्रशासकही आहेत. गोव्याचा शाश्वत विकास करून त्यांना गोव्याला आपल्या पायावर उभे करायचे आहे आणि ते त्यातही नक्कीच यशस्वी होतील.’’
भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे, आमदार सुरेश घाडे, जनसुराज्यचे समित कदम, माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे, मयूर समूहाचे डॉ. संजय पाटील आदी उपस्थित होते. डॉ. शरद टोपकर यांनी प्रास्ताविक केले. नेहा जाधव यांनी मानपत्राचे वाचन केले. डॉ. रणजीत सावंत यांनी आभार मानले. डॉ. अभय लुनावत यांनी मित्र परिवारातर्फे मनोगत व्यक्त केले. भाजप वैद्यकीय आघाडी, निमा संघटना, केदारी रेडेकर आयुर्वेद महाविद्यालय आदी संस्था, संघटनांतर्फेही डॉ. सावंत यांचा सत्कार झाला.

आमचा छोटासा स्वार्थ आहे...
डॉ. प्रमोद सावंत यांच्या सत्काराच्या निमित्ताने आपण सगळे एकत्र आलो आहे; पण ‘कोल्हापूर उत्तर''ची निवडणूक आहे. त्यामुळे आमचाही छोटासा स्वार्थ आहे. तो डॉ. सावंत पूर्ण करतीलच; पण आमचे हे रोजचेच असल्याचे आमदार डॉ. विनय कोरे यांनी सांगताच एकच हशा पिकला. डॉ. सावंत यांच्या रूपाने गोव्याला सक्षम नेतृत्व मिळाले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली ते गोव्याचा शाश्वत विकास करतील. सर्वसामान्यांची नस नरेंद्र मोदी चांगली ओळखतात आणि ती ओळखूनच गोव्याची सर्वस्वी जबाबदारी डॉ. सावंत यांच्यावर त्यांनी दिल्याचेही ते म्हणाले.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..