सुसंस्कारीत मुलं हिच खरी संपत्ती ः बाबासाहेब परीट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सुसंस्कारीत मुलं हिच खरी संपत्ती ः बाबासाहेब परीट
सुसंस्कारीत मुलं हिच खरी संपत्ती ः बाबासाहेब परीट

सुसंस्कारीत मुलं हिच खरी संपत्ती ः बाबासाहेब परीट

sakal_logo
By

13449
आजरा : गंगामाई वाचन मंदिरात कथाकथन करताना बाबासाहेब परीट.

सुसंस्कारित मुलं हिच खरी संपत्ती
बाबासाहेब परीट : श्रीमंत गंगामाई वाचन मंदिरात व्याख्यानमाला सुरू
सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. ८ ः पैसा व अन्य सुखसोयींपेक्षा सुसंस्कारित व गुणवंत मुलं हिच खरी संपत्ती आहे. अशी मुले तयार झाल्यास आई-वडिलांसह, शिक्षक व गावाचा गौरव होतो, असे मत ज्येष्ठ साहित्यिक व कथाकथनकार बाबासाहेब परीट (सांगली) यांनी व्यक्त केले.
येथील श्रीमंत गंगामाई वाचन मंदिरतर्फे आयोजित व्याख्यानमालेत परीट यांनी पहिले पुष्प गुंफले. त्यांनी सिंगापुरची वारी, शिकार यावर कथाकथन केले. वाचन मंदिराचे अध्यक्ष डॉ. अशोक बाचुळकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. उपाध्यक्षा गीता पोतदार, मराठा महासंघाचे युवाध्यक्ष व प्रायोजक रोहित नार्वेकर, कार्यवाह विजय राजोपाध्ये व्यासपीठावर उपस्थित होते.
मान्यवरांचा या वेळी सत्कार झाला. परीट म्हणाले, ‘‘आजऱ्यामध्ये सुगंधी घनसाळ, काळा जीरगा हे भात आहे. येथील मातीला गंध आहे. त्याचबरोबर माणसे ही साधी सरळ व सुगंधित आहेत. येथील मातीमध्ये मृत्युंजकार शिवाजीराव सावंत यांनी साहित्याची बीज पेरली. आजही नवसाहित्यिक मातीतून तयार होत आहेत. ही या मातीची ताकद आहे. सुसंस्कारित पिढी तयार करण्याचे समाजासमोर आव्हान आहे. यासाठी पालकांच्याबरोबर शिक्षकांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. समाजात स्‍त्रियांचा सन्मान करणे आवश्यक आहे. स्त्रीला स्वतःची ओळख पटली किंवा स्वतःतील शक्ती कळाली, तर इतिहास घडेल.’’ त्यांच्या कथाकथनाने रसिक मंत्रमुग्ध झाले. या वेळी साहित्यिक राजा शिरगुप्पे, मुकुंदराव देसाई, सुधीर देसाई, प्रा. सुधीर मुंज, जी. एम. पाटील, अनिकेत चराटी, सुभाष विभूते, शंकरराव शिंदे, मारुती मोरे, पी. बी. पाटील, संभाजी इंजल, शिवाजी इंजल, रणजित देसाई, सुनील सुतार, डॉ. अंजनी देशपांडे, मीना मंगरुळकर, अनुष्का गोवेकर उपस्थित होते. कार्यवाह सदाशिव मोरे यांनी स्वागत, सूत्रसंचालन व आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top