सतेज पाटील मुलाखत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सतेज पाटील मुलाखत
सतेज पाटील मुलाखत

सतेज पाटील मुलाखत

sakal_logo
By

13609
सतेज पाटील (कट आऊट करणे)

कोल्हापूरकर मतदानातून
माणुसकी, बंधूभाव दाखवतील

लीड
आपल्या बहिणीला निवडून देऊन कोल्हापूरकर संपूर्ण देशाला कोल्हापुरात आजही माणुसकी आणि बंधूभाव शिल्लक असल्याचे दाखवून देतील. महाराणी ताराराणींच्या भूमीत एका भगिनीला कोल्हापूरकर अर्ध्यावर सोडणार नाहीत. त्यामुळे जयश्री जाधव यांचा विजय नक्की आहे. कोल्हापूरकरांना वाऱ्यावर सोडून गेलेल्यांना घेऊन लढणाऱ्या भाजपचे कोल्हापुरातील स्थान समजते. भाजप-शिवसेना युतीमुळे कार्यकर्ते पाठीशी होते, आता तेच नसल्याने भाजपला बाहेरची माणसं आणावी लागत आहेत. गुंडगिरी-दडपशाही ज्यांच्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यांनी आरोप करताना विचार करावा, असे स्पष्ट मत पालकमंत्री सतेज पाटील यांनी व्यक्त केले.
-लुमाकांत नलवडे

प्रश्‍न : शहर विकासाच्या मुद्द्यांबाबत काय सांगाल?
सतेज पाटील : कोल्हापुरातील विमानसेवा दर्जेदार करण्‍यासाठी निधी आणला आहे. त्याचे काम सुरू आहे. हुतात्मा पार्क आणि महावीर गार्डनचे नूतनीकरण होत आहे. इनडोअर गेमसाठी १० कोटींचा निधी दिला आहे. जिल्हा नियोजन समितीतून ‘मिशन गोल्ड’ योजनेच्या माध्यमातून खेळाडूंना प्राधान्य दिले जात आहे. फुटबॉलसाठी सराव मैदान तयार करणार आहोत. अंबाबाई मंदिरासाठी यापूर्वी ७-८ कोटींचा तर अर्थसंकल्पात २५ कोटींचा निधी जाहीर झाला आहे. शहरातील पार्किंग आणि वाहतूक नियोजनाचे प्रयत्न सुरू आहेत. थेट पाईपलाईनचे काम लवकरच पूर्ण होणार आहे. शहरातील प्रॉपर्टी कार्डे, बी टेन्यूअरचे प्रश्‍न मार्गी लावले आहेत. त्यामुळे शहर विकासाला चालना देण्याचे काम आम्ही केले आहे. याच विकासाच्या मुद्द्यांवर मतदारांना सामोरे जात आहे.

प्रश्‍न : गुंडशाही- दडपशाही सुरू असल्याचे आरोप होत आहे?
सतेज पाटील : गुंडशाही-दडपशाही महाडिकांच्या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. स्वतः चोरी करायची आणि दुसऱ्याकडे बोट दाखवून आपण नामानिराळे राहायचे अशी त्यांची वृत्ती आहे. निवडणूक काळातील १५ दिवसांतील महाडिक आणि भाजप नेत्यांचा प्रचार व तेथील वक्तव्ये पाहिल्यास गुंडगिरी कोण करते, दडपशाही कोण करते, हे समजून येईल. त्यामुळे त्यांनी केलेला दडपशाहीचा आरोप हास्यास्पद आहे.

प्रश्‍न ः निवडणूक लादली म्हणणे कितपत योग्य आहे?
सतेज पाटील ः ही निवडणूक बिनविरोध होणे महत्त्‍वाचे होते. तरीही निवडणूक लादली गेली. उमेदवारी अर्ज दाखल करतानाही भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील हे जयश्री जाधव यांनी भाजपकडून निवडणूक लढवावी, आमच्या उमेदवाराची माघार घेतो, समजूत काढतो, असे माध्यमांसमोर सांगतात. तेव्हाच जयश्री जाधव सक्षम उमेदवार आहेत, हे ते मान्य करतात. त्यामुळे आमदार चंद्रकांत पाटील यांना जयश्री जाधव यांच्या विरोधात बोलण्याचा काय अधिकार आहे? एखाद्या कुटुंबात लोकप्रतिनिधीचा मृत्यू झाला तर तेथे निवडणूक बिनविरोध करण्याची परंपरा आहे; मात्र या परंपरेला भाजपने कोल्हापुरात तिलांजली दिली.

प्रश्‍न : प्रचारात आरोप करणाऱ्यांबद्दल काय सांगाल?
सतेज पाटील : कोल्हापूरकरांना वाऱ्यावर सोडून गेलेल्यांना आता कोल्हापुरात का यावे लागते? पुण्यातील लोकसभा निवडणुकीसाठी ‘इमेज’ तयार करण्यासाठीचे काम चंद्रकांत पाटील हे कोल्हापूरच्या पोटनिवडणुकीच्या माध्यमातून करत आहेत. कोल्हापुरात निवडणूक लढविताना बाहेरचे कार्यकर्ते आणावे लागतात, यावरून त्यांना त्यांच्या कोल्हापुरातील कार्यकर्त्यांवर विश्‍वास नसल्याचे स्पष्ट होते. त्यांच्या पाठीशी जे कार्यकर्ते होते ते शिवसेनेचे होते. आजपर्यंत भाजपला जे मतदान झाले होते ते शिवसेनेमुळे झाले होते. मात्र आता शिवसेना सोबत नसल्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू घसरली आहे. शिवसेनेबाबत चुकीची वक्तव्य केली जात आहेत. चंद्रकांत पाटील यांना कोल्हापूरकर प्रतिसाद देणार नाहीत.

प्रश्‍न ः प्रचार आणि निकालाबद्दल काय वाटते?
सतेज पाटील ः आपल्या बहिणीला निवडून देऊन कोल्हापूरकर देशाला कोल्हापुरात अजूनही माणुसकी आणि बंधूभाव शिल्लक आहे, हे दाखवून दिल्याशिवाय राहणार नाहीत. जयश्री जाधव यांचा विजय नक्की आहे. कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, शेकाप, कम्युनिस्ट पक्ष आदी घटक पक्षांकडून ताकदीने प्रचार सुरू आहे. भाजप आत्तापर्यंत शिवसेनेवर अवलंबून होती. कोल्‍हापूरकर मतदानातून आपली ठोस भूमिका दाखवून जयश्री जाधव यांनाच विजयी करतील, असा विश्‍वास वाटतो.
-------
चौकट
पंचगंगा प्रदूषणमुक्तीसाठी काय करावे?
सतेज पाटील ः पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी केंद्र शासनाकडून निधीची व्यवस्था व्हायला हवी. पुण्यातील मुळा-मुठा नदीप्रदूषणमुक्त करण्यासाठी प्रकाश जावडेकर यांनी ४०० कोटींचा निधी उपलब्ध करून दिला. तेथील नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी पुढाकार घेतला. अशाच पद्धतीने कोल्हापुरातील पंचगंगा प्रदूषणमुक्त करण्यासाठी केंद्र शासनाकडून चार-पाचशे कोटींचा निधी उपलब्ध झाला असता तर आज पंचगंगा प्रदूषणमुक्त झाली असती. केंद्रात भाजपचे सरकार आहे. त्यांनी आजही तेथून चार-पाचशे कोटींचा निधी उपलब्ध करून पंचगंगा प्रदूषणमुक्तीसाठी प्रयत्न करावा.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top