शिवसेने मतदार गमावू नये ः चंद्रकांत पाटील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवसेने मतदार गमावू नये ः चंद्रकांत पाटील
शिवसेने मतदार गमावू नये ः चंद्रकांत पाटील

शिवसेने मतदार गमावू नये ः चंद्रकांत पाटील

sakal_logo
By

शिवसैनिकांनो भाजपला
मतदान करा : चंद्रकांत पाटील

पारंपरिक मतदार टिकविण्याचे आवाहन

कोल्हापूर, ता. ९ ः मुख्यमंत्रिपद टिकवण्यासाठी उद्धव ठाकरे शिवसैनिकांना त्याग करण्याचे आवाहन करत आहेत पण स्वतःचे किती मतदारसंघ ते हातचे घालवत आहेत, याची शिवसैनिकांना कल्पना नाही. त्यामुळे शिवसैनिकांनी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला मतदान करून आपला पारंपरिक मतदार टिकवला पाहिजे, असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत केले.
यावेळी श्री. पाटील म्हणाले, ‘कोल्हापूर उत्तर मतदारसंघात पाचवेळा शिवसेनेचा उमेदवार निवडून आला. आत्ताही जागा शिवसेनेला मिळायला हवी होती. पण स्वतःचे मुख्यमंत्री पद टिकवण्यासाठी शिवसैनिकांना त्याग करण्यास सांगितले जात आहे. अशाच पद्धतीने त्यांनी देगलूर आणि पंढरपूर हे दोन्ही मतदारसंघ गमावले. जिल्ह्याचा विचार केला तर करवीर, उत्तर मतदारसंघ, शिरोळ, हातकणंगले हे मतदारसंघ त्यांनी गमावले. आता जर शिवसैनिकांनी काँग्रेसला मतदान केले तर त्यांचा हक्काचा मतदार पुन्हा शिवसेनेकडे वळणे अवघड आहे. त्यामुळे शिवसैनिकांनी याचा विचार केला पाहिजे. मुख्यमंत्री पद टिकवण्यासाठी किती बळी द्यायचे याचा विचार केला पाहिजे. उद्धव ठाकरे यांनीही हिंदुत्‍व पुसू नका असे आवाहन केले आहे. यायाच अर्थ शिवसैनिक भाजपला मतदान करतील याची खात्री आहे. भाजपचे प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये, राहुल चिकोडे उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top