
उत्तर विधानसभा निवडणूक
लोगो- जाधववाडी- रूईकर कॉलनी परिसर
-
सकाळी रांगा, तर दुपारी गर्दी कमी
कोल्हापूर ः आज उपनगरीय भागात मतदानासाठी कही खुशी कही गम असे चित्र होते व मुक्त सैनिक वसाहत, भोसलेवाडी, जाधववाडी, विचारेमाळ भागात मतदानासाठी दुपारपर्यंत रांगा होत्या, तर रूईकर कॉलनी, महाडिक वसाहत, भारती विद्यापीठ मतदान केंद्रावर मोजका वेळ वगळता बहुतांशी निरूत्साह दिसत होता.
पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर प्रचार जोरदार सुरू झाला. यात काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी पक्षांची महाविकास आघाडी तसेच भाजपने शहरातील मध्यवर्ती बहुतांशी भागात सभा घेतल्या. मात्र उपनगर भागात व्यक्तिगत भेटीगाठी, मोजक्या बैठका, क्वचित सभा घेतल्या. मात्र, कार्यकर्त्यांच्या बळावर जोरदार संपर्क यंत्रणा राबवली. अन्य उमेदवार व त्यांच्या पक्षाची प्रचार यंत्रणा जेमतेम होती. या साऱ्याचा परिणाम म्हणून उपनगर भागात मतदान वाढेल असे दिसत होते. त्यानुसार सकाळी फिरायला गेलेले नागरिक जाता जाता मतदान करून घरी जाण्यासाठी मतदान केंद्रावर गेले. सकाळी मतदान सुरू झाल्यापासून गर्दी झाली. मुक्त सैनिक वसाहत, जाधववाडी, भोसलेवाडी या केंद्रावर असे चित्र होते. भाजपचे उमेदवार सत्यजित कदम यांनी भोसलेवाडी केंद्रावर मतदान केले. त्यानंतर शहरातील विविध मतदान केंद्रांवर भेट देण्यासाठी ते कार्यकर्त्यांसह निघून गेले.
सकाळी अकरा वाजेपर्यंत मुक्त सैनिक वसाहत, जाधववाडी, भोसलेवाडी, विचारेमाळ, कपूर वसाहत येथील मतदान केंद्रावर रांगा होत्या. दुपारी दीड दोन वाजल्यानंतर मात्र रांग कमी झाली. तर रूईकर कॉलनी, महाडिक वसाहत या केंद्रावर सकाळी अकरा ते बारा या वेळेत रांग मोठी होती. दुपारनंतर कमी संख्येने मतदान झाले. बहुतेक केंद्रांवर २० ते ३८ टक्के मतदान झाले होते. चार वाजता पुन्हा सर्वच केंद्रांवर कमी-अधिक गर्दी झाली.
चौकट
पोलिसांच्या फेऱ्या
सर्वच केंद्रांवर पोलिसांच्या फेऱ्या होत होत्या. कोणताही अनुचित प्रकार कुठेही घडला नाही. पालकमंत्री सतेज पाटील यांनी विविध केंद्रांवर भेट दिली. कपूर वसाहत, जाधववाडीत काही रिक्षाचालक मतदान आणण्यासाठी नियुक्त केले होते. त्यांनी वृद्ध व्यक्ती, आजारी व्यक्ती रिक्षातून मतदानासाठी आणून सोडले.
चौकट
कार्यकर्त्यांचा उत्साह
पक्षीय कार्यकर्त्यांनी मतदान केंद्रापासून शंभर मीटरवर बूथ घालून येणाऱ्या मतदारांना क्रमांक शोधून देण्याचे काम सुरू झाले. सर्वच केंद्रांवर कार्यकर्त्यांचा उत्साह होता.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..