उदय कुलकर्णी पुस्तक प्रकाशन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उदय कुलकर्णी पुस्तक प्रकाशन
उदय कुलकर्णी पुस्तक प्रकाशन

उदय कुलकर्णी पुस्तक प्रकाशन

sakal_logo
By

१४५६०

उदय कुलकर्णी यांच्या
पुस्तकाचे उद्या प्रकाशन
कोल्हापूर, ता. १२ ः येथील ज्येष्ठ पत्रकार उदय कुलकर्णी लिखित ‘काळीजखुणा’ या पुस्तकाचे प्रकाशन गुरूवारी (ता.१४) होणार आहे. एनसीसी भवन परिसरातील राम मंगल सांस्कृतिक भवनात सकाळी साडेनऊ वाजता कार्यक्रम होईल. कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन रावा प्रकाशन संस्थेने केले आहे.
‘माणसाने माणसाशी माणसासम वागणे‘ असे मानणाऱ्या व तसे जगणाऱ्या अनेक माणसांच्या सहवासातील अनुभवांवर हे पुस्तक असून प्रसिध्द अभिनेत्री शुभांगी संगवई-गोखले यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन होईल. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शिक्षणतज्ञ प्रा. डी. यू. पवार असतील. कोल्हापूर प्रेस क्लब, शिवाजी विद्यापीठ सेवक संघ, दिलासा सामाजिक विश्वस्त संस्था, रावा प्रकाशन संस्‍थेच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम होणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top