सतेज पाटील प्रेस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सतेज पाटील प्रेस
सतेज पाटील प्रेस

सतेज पाटील प्रेस

sakal_logo
By

भाजपच्या गलिच्छ राजकारणाला जनतेचे उत्तर
पालकमंत्री सतेज पाटील; आघाडीच्या जयश्री जाधव विजयी होणारच
कोल्हापूर, ता. १२ ः ‘‘भाजपने ही निवडणूक लादली. माझ्या वैयक्तिक बदनामीबरोबरच महिलांबद्दल अनुद्‍गार काढून गलिच्छ राजकारण करत निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न केला. त्याला उत्तर मतदारसंघातील सामान्य जनतेने उत्तर दिले असून १६ तारखेला महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव या निवडून येणार याची १०० टक्के खात्री आहे. २५ हजारांच्या खाली मताधिक्य येणार नाही, ’’ असा विश्‍वास पालकमंत्री सतेज पाटील यांनी पत्रकार परिषदेत आज व्यक्त केला.
पालकमंत्री पाटील म्हणाले, ‘‘पोटनिवडणूक म्हटली की टक्केवारी कमी होते; पण एखादा टक्काच कमी मतदान झाले आहे. त्यासाठी आघाडीतील सर्व मित्रपक्ष प्रामाणिकपणे राबले. त्यांचे तसेच मतदारांना धन्यवाद देतो. कोल्हापूरच्या विकासाचा विश्‍वास असल्याने नवमतदारही आघाडीसोबत आहेत. ते मतमोजणीदिवशी समजेल. माझ्याभोवती निवडणूक करण्याचा प्रयत्‍न केला. माझी बदनामी करून मते मिळवता येतील अशी त्यांची धारणा होती. आघाडीची महारॅली झाल्यानंतर भाजपने कोल्हापूरकरांना विकत घेण्याचा प्रयत्न केला. तो जनतेने हाणून पाडला. एका भगिनीचा पराभव करण्यासाठी भाजपचे राज्यातील दिग्गज नेते आले. पाच-सहा हजार कार्यकर्ते घरोघरी फिरत होते; पण आम्ही कुणाच्या डोक्यावर बंदूक ठेवून जमिनी घेतलेल्या नाहीत की कुळे म्हणून घुसलेलो नाही, हे कोल्हापूरकरांना चांगले माहीत आहे. कोल्हापूरच्या विकासाचा मुद्दा घेऊन जात असल्याने जनतेने जो विश्‍वास दाखवला आहे तो मतमोजणीतून स्पष्ट होणार आहे.’’
प्रशासनाने पारदर्शकपणे काम केल्याचे सांगत ते म्हणाले, ‘‘प्रशासनाने निवडणूक आयोगाच्या नियमानुसार काम केले. कोणत्याही दबावाखाली नव्हते तरी प्रशासनाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. भाजपचे येन-केन प्रकारे निवडणूक जिंकणे हे लोकशाहीला घातक असून आता समयसूचकतेने वागणे गरजेचे आहे.’’

कायदा-सुव्यवस्था...
घटनेच्या आधारावर पक्ष चालतो का याचा अभ्यास करण्याची गरज निर्माण झाली आहे. राज ठाकरेंनी मशिदीवरील भोंग्यांबाबत दिलेले अल्टिमेटम हा त्यांचा विषय आहे. राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखणे सरकारची जबाबदारी आहे. नियमात राहून कायद्याची अंमलबजावणी केली जाईल, असे पालकमंत्री सतेज पाटील यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top