
देसाई हॉस्पिटलतर्फे १५० रुग्णांची तपासणी
16625
आजरा : ग्रामीण रुग्णालयात झालेल्या आरोग्य मेळाव्यात देसाई हॉस्पिटलतर्फे रुग्णांची तपासणी करण्यात आली.
देसाई हॉस्पिटलतर्फे
१५० रुग्णांची तपासणी
गडहिंग्लज, ता. २१ : येथील देसाई हॉस्पिटलतर्फे १५० हृदयरुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली. आजरा येथील मृत्युंजयकार शिवाजीराव सावंत ग्रामीण रुग्णालयात झालेल्या आरोग्य मेळाव्यात ही तपासणी झाली. आझादी का अमृतमहोत्सव अंतर्गत हा मेळावा झाला. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन झाले. उपनगराध्यक्षा संजीवनी सावंत, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवराज कुपेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. हृदयरोग तज्ज्ञ डॉ. रोहित देसाई यांनी रुग्णांची तपासणी केली. देसाई हॉस्पिटलमध्ये महात्मा जोतीराव फुले जनआरोग्य योजना कार्यान्वित असून त्याचा लाभ घेण्याचे आवाहन डॉ. देसाई यांनी केले.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..