घाळी महाविद्यालयात रसायनशास्त्र विभागातर्फे कार्यशाळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

घाळी महाविद्यालयात रसायनशास्त्र विभागातर्फे कार्यशाळा
घाळी महाविद्यालयात रसायनशास्त्र विभागातर्फे कार्यशाळा

घाळी महाविद्यालयात रसायनशास्त्र विभागातर्फे कार्यशाळा

sakal_logo
By

घाळी महाविद्यालयात कार्यशाळा
गडहिंग्लज : येथील डॉ. घाळी महाविद्यालयात रसायनशास्त्र विभागातर्फे ‘अ शॉर्ट टर्म कोर्स इन इंटरप्रिंटेशन ऑफ एनएमआर स्पेक्ट्रा’ या विषयावर एकदिवशीय कार्यशाळा उत्साहात झाली. ‘अँटी कॅन्सर ड्रग’चे संशोधन व त्यांचा उपयोग या भित्तीपत्रकाच्या अनावरणाने कार्यशाळेची सुरुवात झाली. उपप्राचार्य प्रा. ए. बी. उंदरे यांच्या हस्ते व डॉ. एम. एम. माने यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. प्राचार्य डॉ. मंगलकुमार पाटील अध्यक्षस्थानी होते. प्रा. डॉ. माने यांचे व्याख्यान झाले. एनएमआर या विषयाचे नेट-सेट तसेच औद्योगिक क्षेत्रात असणारे महत्त्व त्यांनी सांगितले. दहादिवसीय कोर्समध्ये रसायनशास्त्राचे ९७ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. त्यांना प्रमाणपत्र वितरित केले. प्रा. एस. डी. जाधव यांनी स्वागत केले. डॉ. के. एन. पाटील यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. संस्थाध्यक्षा श्रीमती रत्नमाला घाळी, कार्याध्यक्ष डॉ. सतीश घाळी, सर्व संचालकांचे प्रोत्साहन मिळाले. प्रा. ए. जी. गोडघाटे व प्राध्यापकांचे सहकार्य मिळाले. प्रा. स्नेहल जाधव यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. रामदास पाटील यांनी आभार मानले.
------------------
कडगावला शैक्षणिक साहित्य वाटप
गडहिंग्लज : कडगाव (ता. गडहिंग्लज) येथील रणनवरे परिवाराने वडिलांच्या प्रथम स्मृतिदिनी शाळेतील मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप केले. इतर सर्व धार्मिक खर्चाला फाटा देऊन कै. माधवराव रणनवरे यांच्या पत्नी उपसरपंच मंजिरी रणनवरे यांच्यासह मुले मेघराज व धनराज रणनवरे यांनी कडगाव परिसरातील गरीब विद्यार्थ्यांना वह्या व पेनचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जोपासल्याने कौतुक होत आहे. गावातील सर्व शाळांतील सुमारे पाचशेहून अधिक विद्यार्थ्यांना हे शैक्षणिक साहित्य वितरित केले.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top