
बिल्डर्स असो. पुरस्कार जाहीर
१६६७३
बिल्डर्स असोसिएशनचे पुरस्कार जाहीर
राजीव लिंग्रस; व्ही. बी. पाटील, अजयसिंह देसाईंचा समावेश
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २१ ः बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया या राष्ट्रीय पातळीवरील बांधकाम संघटनेच्या वतीने रस्ते बांधणीतील योगदानाबद्दल कॉन्ट्रॅक्टर कै. सुहास गणपतराव लिंग्रस, अर्थमुव्हिंग क्षेत्रातील विशेष कार्याबद्दल कै. कृष्णात ज्ञानदेव कोंडेकर व पूल बांधणीतील कार्याबद्दल कै. बाबूराव भाऊसाहेब निगडे यांना मरणोत्तर जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. तसेच बांधकाम व सामाजिक कार्याबद्दल व्ही. बी. पाटील यांना विशेष जीवनगौरव पुरस्कार तर बहुमजली इमारत प्रकल्पाबद्दल अजयसिंह देसाई यांना उत्कृष्ट वास्तुनिर्मिती पुरस्काराने गौरविण्यात येणार असल्याचे अध्यक्ष राजीव लिंग्रस यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले.
बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया या संघटनेच्या कोल्हापूर सेंटरच्या वतीने नव्याने निवडण्यात आलेल्या पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्यांचा पदग्रहण समारंभ उद्या (ता. २२) होणार आहे. कात्यायनी येथील कोंडेकर लॉनमध्ये सायंकाळी पाच वाजता समारंभ आणि पुरस्कार वितरणाचा सोहळा होईल. येथे श्रीमंत शाहू महाराज, खासदार संजय मंडलिक प्रमुख पाहुणे असणार आहेत. तसेच असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश पाटील, राज्याचे अध्यक्ष दत्तात्रय मुळे, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता महेश सुर्वे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता शामराव कुंभार उपस्थित असणार आहेत.
८१ वर्षांच्या प्रवासात संस्थेने प्रारंभीच्या अडीचशे सभासदांपासून आत्तापर्यंत सुमारे १५ हजार सभासद संख्या झाली आहे. देशभरातील १४८ हून अधिक शहरांत संस्थेची कार्यालये आहेत. परिषदेस नवीन अध्यक्ष ऋषीकेश यादव, सी.जी.मेंबर प्रताप कोंडेकर, सचिन पाटील उपस्थित होते.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..