
जयप्रभा आंदोलन
१६६४६
‘जयप्रभा‘ आंदोलनाला
वर्षा उसगांवकर यांचा पाठिंबा
कोल्हापूर ः जयप्रभा स्टुडिओ चित्रीकरणाठी कायमस्वरुपी खुला व्हावा, या मागणीसाठी सुरू असलेल्या साखळी उपोषणाला आज अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांनी पाठिंबा दिला. सर्व रंगकर्मी व आंदोलकर्ते अत्यंत संयमाने व शांततेने आंदोलन करत असून या आंदोलनातर्फे शासनाला जागे करण्याचा प्रयत्न आहे. स्टुडिओत पुन्हा दिमाखात शूटिंग सुरु व्हावे, अशी अपेक्षा यावेळी त्यांनी व्यक्त केली. यावेळी महामंडळाचे उपाध्यक्ष धनाजी यमकर, संचालक सतीश बिडकर, रणजित जाधव, मिलिंद अष्टेकर, चंदा बेलेकर, गीतांजली ढोबे, निकिता माने, धनश्री जाधव, राहुल राजशेखर, इम्तियाज बारगीर, संग्राम भालकर, बाळू बारामती, अमर मोरे, सुनील मुसळे, नीलेश जाधव, दीपक महामुनी, संजय पटवर्धन, शशी यादव, रवींद्र बोरगांवकर आदी उपस्थित होते.
वसुंधरा दिनानिमित्त रविवारी चित्रकला स्पर्धा
कोल्हापूर ः वसुंधरा दिनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महापालिका, अमुज क्राफ्ट, खोफा बर्डसहाऊस आणि आभाळमाया फाऊंडेशनच्या वतीने रविवारी (ता.२४) चिऊताईच्या घरट्यावर चित्रकला स्पर्धा होणार आहे. पाचवी ते सातवी आणि आठवी ते दहावी व खुला अशा तीन गटांत महावीर उद्यान येथे सकाळी सात ते अकरा या वेळेत ही स्पर्धा होईल. पाचवी ते सातवी गटासाठी ‘पर्यावरणातील पक्ष्यांचे स्थान'', आठवी ते दहावी गटासाठी ‘मी आणि पर्यावरण'' आणि खुल्या गटासाठी ‘इकोफ्रेंडली सिटी‘ असे विषय आहेत. घरटे रंगवण्यासाठी स्पर्धकांनी स्वतः रंग साहित्य आणायचे असून संयोजकांकडून घरटे दिले जाईल. स्पर्धकाने त्यावर सुंदर चित्र काढावे. स्पर्धेनंतर ते स्पर्धकाला घरी लावण्यासाठी दिले जाणार आहे. स्पर्धेच्या ठिकाणी सकाळी साडेसात ते साडेआठ या वेळेत नावनोंदणी होणार असून इच्छुकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..