पोलिस वृत्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोलिस वृत्त
पोलिस वृत्त

पोलिस वृत्त

sakal_logo
By

१७१३६
तीन लाखांचा मुद्देमाल परत देणाऱ्या
रेल्वे पोलिस मुजुमदार यांचा सत्कार
कोल्हापूर ः लोहमार्ग पोलिस कर्मचारी योगेश मुजुमदार यांनी रेल्वेत सापडलेले पाच तोळे सोन्याचे दागिने, कॅमेरा असा एकूण तीन लाखांचे साहित्य असलेली बॅग संबंधिताला परत केली. त्यांच्या या प्रामाणिकपणाबद्दल मिरज लोहमार्ग पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संभाजी काळे, स्टेशन प्रबंधक विजय कुमार यांच्या हस्ते मुजुमदार यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सहायक फौजदार सुनील निळकंठ, अमंलदार सदा पाटील आदी उपस्थित होते.

अत्याचारप्रकरणी खुपिरेतील तरुणाला कोठडी
पन्हाळा ः लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी खुपिरे (ता. करवीर) येथील पवन बाजीराव सुर्वे (वय २०) याच्यावर पन्हाळा पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, खुपिरे येथील पवन सुर्वे यांने अल्पवयीन मुलीला व्हिडिओ कॉल करून तिच्याशी मैत्री वाढवली. लग्नाचे आमिष दाखवून घरी कोणास न सांगता आधारकार्ड आणि दागिने घेऊन येण्यास सांगितले. त्याने तिला पन्हाळा पायथ्याशी असलेल्या एका लॉजवर आणून जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. याबाबत पीडित मुलीने पोलिसांत तक्रार दिल्याने पवनला अटक केली. त्याला कोल्हापूर येथील जिल्हा सत्र न्यायालयाने २६ तारखेपर्यंत पोलिस कोठडी दिली. तपास पोलिस उपनिरीक्षक आर. पी. ठाणेकर करत आहेत.

1886
188५
वसगडेनजीक मोटारींची धडक
गांधीनगर : गडमुडशिंगी- वसगडे रस्त्यावर माळी मळ्यानजीक चारचाकींची समोरासमोर धडक होऊन चौघे जखमी झाले. हा अपघात आज सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडला. शौकत अलीसाब रखांगी, चांद अब्दुल रहमान सारंग (दोघे रा. लांजा) आणि संदीप नेमगोंडा पाटील, नेमगोंडा नरसगोंडा पाटील (वसगडे) अशी जखमींची नावे आहेत. मोटार (एमएच 08-आर 6062) व मोटार (एम एच 12- जी व्ही-2290) यांच्यामध्ये समोरासमोर जोरदार धडक झाली. धडक इतकी जोरदार होती की दोन्ही मोटारींची चाके निखळून पडली. दोन्ही गाड्यांचे प्रचंड नुकसान झाले. चौघांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना सीपीआरमध्ये दाखल केले. याबाबत गांधीनगर पोलिसांत महादेव शंकर ढोकरे यांनी फिर्याद दिली असून अधिक तपास हेड कॉन्स्टेबल विराज डांगे करत आहे.

दोन मोटारसायकलची चोरी
कोल्हापूर ः शहराच्या दोन वेगवेगळ्या भागातून चोरट्याने दोन मोटारसायकल भरदिवसा चोरून नेल्या. मध्यवर्ती बस स्थानक परिसरातून मंगळवारी (ता.१९) चोरट्याने मोटारसायकल चोरून नेली. तसेच दमवाडी परिसरातून बुधवारी (ता.२०) चोरट्याने एका हॉटेलच्या दारात पार्कींग केलेली मोपेड चोरून नेली. याची नोंद शाहूपुरी पोलिस ठाण्यात झाली.

टाकाळा येथून गायीची चोरी
कोल्हापूर ः टाकाळा येथून चोरट्याने ४० हजार रूपये किमंतीच्या दोन गायी चोरून नेल्या. हा प्रकार सोमवारी (ता.१८) सकाळी निदर्शनास आला. याची नोंद राजारामपुरी पोलिस ठाण्यात झाली.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top