निधन आवश्‍यक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निधन आवश्‍यक
निधन आवश्‍यक

निधन आवश्‍यक

sakal_logo
By

०१८०२

पै. संजय माने यांचे निधन
कोल्हापूर ः कोकरूड (ता. शिराळा) येथील महाराष्ट्र चॅम्पियन पै. संजय बबन माने (वय ४९) यांचे मुंबईत निधन झाले. माने मुंबईत रेल्वेमध्ये नोकरीस होते. त्यांनी कुस्तीमधे तीन वेळा महाराष्ट्र चॅम्पियन किताब मिळवला होता. त्यांना महाराष्ट्र शासनाने शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराने गौरवले होते. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, आई भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे.

१७१५०
प्रताप सूर्यवंशी
कोल्हापूर ः सोमवार पेठ घिसाड गल्ली येथील प्रताप शामराव सूर्यवंशी (वय ५७) यांचे निधन झाले. रजपूत चितोडिया समाजाचे ते कार्यकर्ते होत. सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल सूर्यवंशी यांचे ते ज्येष्ठ बंधू होत. त्यांच्या मागे मोठा मित्र परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. २४) आहे.

१७१५४
हौसाबाई चौगुले
इचलकरंजी : येथील हौसाबाई महादेव चौगुले (वय ८५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे तीन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. २४) आहे.

००८६४
निर्मला देसाई
कडगाव : कडगाव (ता. भुदरगड) येथील श्रीमती निर्मला हिंदूराव देसाई (वय ७५) यांचे निधन झाले. उद्योगपती अजित देसाई व पुण्याचे पोलिस उपअधीक्षक बजरंग देसाई यांच्या त्या होत. त्यांच्या मागे दोन मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. २४) आहे.

१७१५२
दीपक यादव
कोल्हापूर ः कसबा बावडा गोळीबार मैदान येथील दीपक तुकाराम यादव (वय ५२) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, आई, वडील, चुलते, बहीण, भाऊ असा परिवार आहे.

०६५९८
अंजना आलुगडे
घुणकी : अंबप (ता. हातकणंगले) येथील अंजना जयसिंग आलुगडे (वय ५५) निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. २४) आहे.

१४७१
विलास शिंदे
कळंबा ः दत्तोबा शिंदे नगरातील विलास दत्तोबा शिंदे (वय ८२) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. परिवहन समितीचे माजी सदस्य यशवंत शिंदे यांचे ते वडील होत. रक्षाविसर्जन रविवारी (ता. २४) आहे.

१७११७
नलिनी कोकणे
कोल्हापूर ः कोकणे मठ, शनिवार पेठ येथील नलिनी दत्तात्रय कोकणे (वय ८२) यांचे निधन झाले. शासकीय मुद्रणालयातून त्या निवृत्त झाल्या होत्या.

१७१७३
प्रभावती पाटील
रुकडी ः चोकाक (ता. हातकणंगले) येथील श्रीमती प्रभावती सुरेंद्र पाटील (वय ८५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, तीन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविर्सजन उद्या (ता. २४) आहे.

३३२८
सूरज चौगुले
इचलकरंजी : अर्जुनवाड (ता. शिरोळ) येथील सूरज बबन चौगुले (वय ३२) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे आई, पत्नी, दोन मुलगे, दोन बहिणी असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी (ता. २५) आहे.

१०५३
हौसाबाई लोखंडे
सोनाळी ः हसूर दुमाला (ता. करवीर) येथील हौसाबाई राऊ लोखंडे (वय ९०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, तीन मुली, सून नातवंडे असा परिवार आहे.

०१५५७
यशवंत मनगूतकर
नेसरी : तावरेवाडी (ता. गडहिंग्लज) येथील यशवंत आप्पा मनगूतकर (वय १००) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलगे, चार मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

१७८८
चंद्राप्पा नलवडे
कसबा बीड ः धोंडेवाडी (ता. करवीर) येथील चंद्राप्पा रामा नलवडे (वय ८१) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, सुना व नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. २४) आहे.

०२९१८
शामराव पाटील
राशिवडे बुद्रुक : कोदवडे (ता. राधानगरी) येथील शामराव ज्ञानू पाटील ( वय ६३) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन रविवारी (ता. २४) आहे.

०२८४७
आक्काताई चौगले
पुनाळ : येथील श्रीमती आक्काताई सदाशिव चौगले (वय ७५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, दोन मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे. भैरवनाथ दूध संस्थेचे अध्यक्ष अरुण चौगले यांच्या त्या आई होत. रक्षाविसर्जन रविवारी (ता. २४) आहे.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top