
व्यापारी नागरी पतसंस्थेला सव्वा कोटींचा ढोबळ नफा
17177
विश्वनाथ पट्टणशेट्टी
व्यापारी नागरी पतसंस्थेला
सव्वा कोटींचा ढोबळ नफा
गडहिंग्लज, ता. २४ : येथील गडहिंग्लज व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेला सन २०२१-२२ या आर्थिक वर्षांत एक कोटी २७ लाख रुपयांचा ढोबळ नफा झाला आहे. आवश्यक त्या तरतुदी करून ७० लाख ९३ हजार रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. कोरोनाच्या बिकट परिस्थितीतून मार्ग काढत संस्थेची यशस्वी घोडदौड सुरू आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष विश्वनाथ पट्टणशेट्टी यांनी दिली.
गेल्या तीन दशकापासून सभासद व संस्थेचे हित जपल्याने संस्था नावारुपाला आली आहे. वर्षअखेरीस भागभांडवल दोन कोटी नऊ लाख रुपयांवर पोचले आहे. संस्थेचा पाच कोटी ९४ लाख रुपयांचा स्वनिधी आहे. या आर्थिक वर्षात ठेवीत एक कोटी ११ लाखांनी वाढ होऊन त्या ५० कोटी २९ लाख रुपयांवर पोहोचल्या आहेत. संस्थेने ३२ कोटी ८२ लाख रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. अतिरिक्त निधीपैकी २६ कोटींची गुंतवणूक केली आहे. गेली अनेक वर्षांपासून एनपीएचे प्रमाण शून्य टक्के ठेवण्याची परंपरा यंदाही कायम राहिली आहे.
सभासद, ठेवीदार, खातेदारांना सीबीएस सुविधा, अद्ययावत लॉकर सुविधा, एसएमएस, क्यूआर कोड सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. संस्थेचे भागभांडवल वाढविण्यासाठी सभासदांनी जास्तीत जास्त रक्कम भरुन शेअर्स घ्यावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. उपाध्यक्षा लक्ष्मी घुगरे, संस्थापक राजशेखर यरटे, संचालक अरुण तेलंग, सदाशिव रिंगणे, आप्पासाहेब देवेकर, वीरुपाक्ष वस्त्रद, रावसाहेब पाटील, स्वाती बेल्लद, ममता मजती, सुरेश आजरी, व्यवस्थापक शंकर वाडेकर आदी उपस्थित होते.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..