शालेय साहित्याच्या वितरणातून जीवलग मित्राला वाहिली श्रद्धांजली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शालेय साहित्याच्या वितरणातून जीवलग मित्राला वाहिली श्रद्धांजली
शालेय साहित्याच्या वितरणातून जीवलग मित्राला वाहिली श्रद्धांजली

शालेय साहित्याच्या वितरणातून जीवलग मित्राला वाहिली श्रद्धांजली

sakal_logo
By

17179
अत्याळ : महाराष्ट्र हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप प्रसंगी आदित्य मोहिते, अजिंक्य पाटील, संदेश मोहिते, श्रीकांत रणनवरे, एन. एल. कांबळे आदी.

शालेय साहित्याच्या वितरणातून
जीवलग मित्राला वाहिली श्रद्धांजली
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २४ : शिक्षणाच्या निमित्ताने एकत्र आलेले ते मित्र. शालेय जीवन संपले तरी त्यांच्यातील स्नेह कायम होता. मात्र, कोरोना संसर्गाचे निमित्त झाले अन् त्यातील एका मित्राची अकाली एक्झिट झाली. बघता बघता वर्ष सरले. त्याच्या मित्रांनी एकत्र येत प्रथम स्मृतिदिनी गावातील सर्व २१८ विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले. अत्याळ (ता. गडहिंग्लज) येथील महाराष्ट्र हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांनी या उपक्रमातून आपल्या जीवलग मित्राला श्रद्धांजली वाहिली.
प्रितेश उर्फ महादेव शिवाजी कोलते या युवकाचे गतवर्षी निधन झाले. प्रथम स्मृतिदिनानिमित्त त्याच्या सन २००९-२० सालच्या बॅचच्या मित्रांनी एकत्र येत विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले. महाराष्ट्र हायस्कूलच्या ११७, महात्मा फुले विद्या मंदिरच्या ७४ तर अंगणवाडीच्या २७ विद्यार्थ्यांना वह्या व पेन्सचे वाटप केले. तर गिजवणे (ता. गडहिंग्लज) येथील मूकबधिर निवासी शाळेतील विद्यार्थ्यांना अल्पोपहार दिला. आदित्य मोहिते, अजिंक्य पाटील, संदेश मोहिते, श्रीकांत रणनवरे यांनी हा उपक्रम राबविला.
मुख्याध्यापक एन. एल. कांबळे, एम. ए. पाटील, तुकाराम पालकर, पुंडलिक पोवार, माधुरी आडसुळे, निलम जाधव, सुधीर गुरव, जगदीश गावित, अनिल कांबळे, रमेश गावडे, मुख्याध्यापक अण्णासाहेब कापसे, गुरुदेव साबळे, स्वाती कापसे, अंगणवाडी सेविका रेवती बुगडे, मंगल चव्हाण, जयश्री गोडसे, शोभा कांबळे, लता पाटील, छाया मोहिते, कौशल्या पाटील आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top