
गवस यांच्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन
17183
गडहिंग्लज : जागृती हायस्कूलमध्ये झालेल्या कार्यक्रमात आनंदा गवस यांच्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन करताना रत्नमाला घाळी, प्रणिता शिप्पूरकर, डॉ. सतीश घाळी, प्रा. सुभाष कोरे आदी.
गवस यांच्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन
गडहिंग्लज : येथील जागृती हायस्कूलचे पर्यवेक्षक आनंदा गवस यांच्या गावपंढरी या काव्यसंग्रहाचे प्रकाशन झाले. विद्या प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा रत्नमाला घाळी अध्यक्षस्थानी होत्या. कवयित्री प्रणिता शिप्पूरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. मुख्याध्यापक विजय चौगुले यांनी स्वागत केले. अक्षरवेध प्रकाशनचे प्रा. सुभाष कोरे यांनी प्रास्ताविक केले. शिप्पूरकर, घाळी, प्रा. शिवाजी भुकेले, संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. सतीश घाळी यांची भाषणे झाली. गवस यांनी संस्थेच्या सर्व विद्या शाखांना काव्यसंग्रहाचे वितरण केले. मुख्याध्यापक श्रीरंग तांबे, एम. बी. गुलगुंजी, उपमुख्याध्यापक व्ही. एस. शिंदे, प्रा. सुनील देसाई, प्रा. अनिता चौगुले, प्रा. विद्या पन्हाळे, प्रभाकर पोतदार, रेखा पोतदार उपस्थित होते. गीता पाटील व कल्पना पाटील यांनी सूत्रसंचालन केले. सुहास पुजारी यांनी आभार मानले.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..