
तेरणीसाठी बससेवा सुरू करण्याची मागणी
17220
गडहिंग्लज : तेरणी गावासाठी बसफेऱ्या सुरू करण्याच्या मागणीचे निवेदन संजय चव्हाण यांना देताना ग्रामपंचायतीचे शिष्टमंडळ.
तेरणीसाठी बससेवा
सुरू करण्याची मागणी
गडहिंग्लज, ता. २४ : गडहिंग्लज आगारातून तेरणीसह परिसरातील प्रवाशांच्या सोयीसाठी तातडीने बसफेरी सुरू करण्याची मागणी केली आहे. याबाबत आगारप्रमुख संजय चव्हाण यांना तेरणीचे सरपंच प्रा. मोहसीन मुल्ला यांच्यासह शिष्टमंडळाने निवेदन दिले. गडहिंग्लज-बुगडीकट्टी बससेवा बंद असल्याने विद्यार्थ्यांसह प्रवाशांचे हाल होत आहेत. यामुळे गडहिंग्लज ते बुगडीकट्टी, गडहिंग्लज बेरडवाडीमार्गे हलकर्णी, तेरणी व हत्तरगी बससेवा सुरू करण्याची गरज आहे. गडहिंग्लज ते बुगडीकट्टीच्या सर्व फेऱ्या चालू करण्यात याव्यात, अशीही मागणी आहे. दरम्यान, तेरणी परिसरातून हत्तरगीतील कंपनीत कामावर जाणारे असंख्य कामगार असल्याने गडहिंग्लज ते हत्तरगी सकाळी आठ व सायंकाळी पाच वाजता नवीन फेरी सुरू करण्याचीही मागणी केली आहे. यामुळे कामगारांसह ग्रामस्थांचीही सोय होणार आहे. ग्रामपंचायत सदस्य करवीर उथळे, जहांगीर जमादार, हसन अंकली, रियाज जमादार आदींच्या शिष्टमंडळाने हे निवेदन दिले.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..