
सुवर्ण जत्रा समारोप बातमी
17373
कोल्हापूरच्या पारंपरिक दागिन्यांना मागणी
राजेश राठोड; सुवर्ण जत्रा उपक्रमाची सांगता
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १७ ः स्थानिक पारंपरिक दागिन्यांना बाजारपेठेत चांगली मागणी आहे, सर्वप्रकारचा ग्राहक या दागिन्यांकडे वळत आहे. सुवर्ण जत्रासारख्या उपक्रमातून ही बाब अधोरेखीत झाली, या पुढेही अशा प्रकारच्या उपक्रमाचे आयोजन व्यवसाय वृद्धीसाठी करू, असा विश्वास जिल्हा सराफ संघाचे अध्यक्ष राजेश राठोड यांनी व्यक्त केला. सुवर्णजत्रा उपक्रमाच्या सांगता समारंभात ते बोलत होते. गुजरी येथे लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्वअंतर्गत सुवर्णजत्रा या उपक्रमाचे आयोजन केले होते. याचा आज समारोप झाला. यावेळी उपाध्यक्ष विजय हावळ यांनी स्वागत केले. सचिव प्रितम ओसवाल यांनी प्रास्ताविक केले. या प्रसंगी राजेश राठोड म्हणाले, ‘गेल्या तीन दिवसांमध्ये गुजरीमध्ये ग्राहकांच्या उत्साहात आणि मोठ्या उलाढालीत सुवर्णजत्रा झाली. याला सुवर्ण कारागीर व सराफ व्यावसायिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या वेळी पारंपरिक साज, ठुशी, बुगडी, टीक, राणीहार, चिताक, शिंदेशाही तोडे अशा दागिन्यांबरोबरच देशभरातील सोने-चांदीच्या दागिन्यांची विक्री झाली.
यावेळी दैवज्ञ शिक्षण समाज बोर्डिंगचे सचिव श्रीराम भुरके, संभवनाथ जैन श्वेतांबर संघाचे रतन गुंदेशा, चंद्रप्रभू जैन बस्तीचे गोटू वणकुद्रे, पांचाल सोनार समाजाचे अध्यक्ष अनिल पोतदार (हुपरीकर), नंदू बेलवलकर, सोने-चांदी बहुउद्देशीयचे नचिकेत भुरके, झारी संघटनेचे शिवाजीराव पोवार, सोने-चांदी संघटनेचे संपत पाटील, कोल्हापूर सराफ व्यापारी पतसंस्थेचे संजय गुंदेशा, चांदी मूर्तिकारचे शामराव पाटील, सोने-चांदी बदला संघटनेचे भरत पाटील, हॉलमार्क संघटनेचे मंगेश शेटे, बंगाली कारागीर संघटनेचे बिश्वजित प्रामाणिक, पटवेगारचे दिलावर तांबोळी, ईश्वर परमार, किरण नकाते, नितीन ओसवाल यांचे सत्कार झाले.
यावेळी सचिव तेजस धडाम यांनी आभार मानले. संचालक कुलदीप गायकवाड, किरण गांधी, ललित ओसवाल, कुमार ओसवाल, अशोककुमार ओसवाल, विजयकुमार भोसले, संजय रांगोळे, भैरू ओसवाल, सिद्धार्थ परमार, शीतल पोतदार, शिवाजी पाटील आदी उपस्थित होते.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..