
घरफाळा घोटाळा कारंडे हजर
घरफाळा घोटाळ्यातील
निलंबित तिघे कामावर
कारंडे, खातू, नंदवाळकर यांचा समावेश
कोल्हापूर, ता. २५ ः महापालिकेतील घरफाळा घोटाळ्याप्रकरणी निलंबित केलेल्या दिवाकर कारंडे, विजय खातू, नितीन नंदवाळकर आज कामावर हजर झाले. त्यांची अनुक्रमे विवाह नोंदणी, ड्रेनेज विभाग व विद्युत विभागात नेमणूक केली आहे. फेब्रुवारी २०२० मध्ये त्यांना निलंबित केले होते.
घरफाळा लावताना घोटाळा केल्याच्या १४ तक्रारी झाल्या होत्या. त्यानुसार चौकशी करून तत्कालीन करनिर्धारक कारंडे, खातू, नंदवाळकर यांना निलंबित केले होते. फौजदारीही दाखल केली होती; पण तीन महिन्यांत त्यांच्यावर दोषारोपपत्र दाखल झाले नाही तर त्यांना पुन्हा सेवेत सामावून घेतले जाते. त्यानुसार राज्य मागासवर्गीय आयोगाकडेही तिघांना हजर करून घेण्याबाबतची मागणी केली होती. आयोगानेही महापालिकेला कळवले होते.
महापालिकेत घरफाळा घोटाळ्याचे प्रकरण गाजले होते. अनेकांना अवैधरित्या घरफाळा कमी करून दिल्याच्या प्रकरणांबाबत तक्रारी केल्या होत्या. त्याप्रमाणे समिती नेमून चौकशी करण्यात आली होती. त्या चौकशीत दोषी आढळलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..