OSM10TJP1.txt | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

OSM10TJP1.txt
OSM10TJP1.txt

OSM10TJP1.txt

sakal_logo
By

संभाजीराजे छत्रपती यांना
गाभाऱ्यात जाण्यास रोखले
तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिरात प्रकार

तुळजापूर (जि. उस्मानाबाद), ता. १० ः येथील तुळजाभवानी मंदिरात खासदार संभाजीराजे छत्रपती यांना मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेण्यास मंदिर प्रशासनाने रोखले. त्यामुळे संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान, या प्रकरणी मंदिरातील अधिकारी आणि व्यवस्थापकांना निलंबित करावे, अशी मागणी मराठा क्रांती ठोक मोर्चाने आज पत्रकार परिषदेत केली.
संभाजीराजे सोमवारी रात्री नऊच्या सुमारास येथे दर्शनासाठी आले होते. यावेळी त्यांना मंदिरातील मुख्य गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेण्यास अधिकाऱ्यांनी रोखले. त्यामुळे या प्रकरणी आता मंदिर प्रशासनाविरोधात रोष व्यक्त केला जात आहे. शिवाय संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करावे, अशी मागणी मराठा क्रांती ठोक मोर्चाने केली आहे. पत्रकार परिषदेला अजय साळुंखे, राज्य समन्वयक जीवन इंगळे, धैर्यशील कापसे उपस्थित होते.

संभाजीराजे छत्रपती आमची अस्मिता आहे. त्यांना चांगल्या प्रकारची वागणूक देणे आवश्यक होते. तथापि, तसे घडले नाही.
- महेश गवळी; राज्य समन्वयक, मराठा क्रांती ठोक मोर्चा


कोल्हापूर संस्थानचा पहिल्या अभिषेकाचा मान असून, कोविड काळातसुद्धा हा मान अबाधित ठेवण्यात आला आहे. देऊळ कवायत कलम ३६ नुसार अभिषेक पूजेनंतर कमासदार पुजाऱ्याव्यतिरिक्त इतरांना गर्भगृहात प्रवेश बंद आहे. संभाजीराजे छत्रपती अभिषेक पूजा, धुपारतीनंतर आले. त्यामुळे नियमानुसार गर्भगृहात प्रवेश देता आला नाही. केवळ नियमाची अंमलबजावणी करण्यात आली. छत्रपती संभाजीराजेंचा पूर्ण सन्मान करण्यात आला आहे.
- योगिता कोल्हे, मंदिर संस्थान व्यवस्थापक तथा तहसीलदार

Web Title: Todays Latest Marathi News Abd22l49031 Txt Kolhapur1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top