झिम्मा-फुगडी स्पर्धेत तुलसी ग्रुप प्रथम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

झिम्मा-फुगडी स्पर्धेत तुलसी ग्रुप प्रथम
झिम्मा-फुगडी स्पर्धेत तुलसी ग्रुप प्रथम

झिम्मा-फुगडी स्पर्धेत तुलसी ग्रुप प्रथम

sakal_logo
By

झिम्मा-फुगडी स्पर्धेत तुलसी ग्रुप प्रथम
---
अब्दुललाट येथे आयोजन; महिलांचा उत्साही सहभाग
अब्दुललाट, ता. ११ : श्रमशक्ती परिवाराच्या अन्नपूर्णा महिला मंडळाने आयोजित केलेल्या महिलांच्या स्पर्धेत इचलकरंजी येथील तुलसी ग्रुपने प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय पंडेवाडी (ता. राधानागरी) येथील धनलक्ष्मी बचत गट, तृतीय रांगोळी येथील गौरीनंदन महिला ग्रुपने पटकावला. उत्तेजनार्थ अब्दुललाटच्या अहिल्यादेवी ग्रुपने मिळविला. अब्दुललाट येथील कल्लेश्वर मंदिराच्या पटांगणावर आयोजित स्पर्धेत वेगवेगळ्या गावांतील महिलांचा उत्स्फूर्त सहभाग होता.
उखाणे स्पर्धेत प्रथम सुरेखा दाडमोडे, द्वितीय प्रमिला सुतार, तृतीय क्रमांक संध्या चौगुले यांनी पटकावला. फुगडी स्पर्धेत प्रथम सारिका पुजारी व निकिता पुजारी, द्वितीय दीपाली शिंदे व सुजाता जाधव, तर तृतीय क्रमांक ऋतुजा पुजारी व सविता बोते यांनी पटकावला. सचिन शिंदे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्‍घाटन झाले. मंगल माळी अध्यक्षस्थानी होत्या. डॉ. नम्रता पाटील यांनी स्वागत केले. स्मिता काळे यांनी प्रास्ताविक केले. जयश्री पाटील, आप्पा पाटील, सरिता कंदले, कुंदा बडबडे, अपर्णा मुद्दापुरे, भारती कुरणे, मीनाक्षी गुरव यांनी मनोगत व्यक्त केले. कोमल चौगुले, कोमल पोतदार, अमृता मगदूम, दीपिका उपाध्ये यांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. सौ. वसवडे व सौ. गांगुर्डे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. श्रृती ठिकणे यांनी सूत्रसंचालन केले. चेतना कांबळे यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Abu22a00015 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..