अतिक्रमण धारकांचा अब्दुल लाट ग्रामपंचायत विरोधी एल्गार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अतिक्रमण धारकांचा अब्दुल लाट ग्रामपंचायत विरोधी एल्गार
अतिक्रमण धारकांचा अब्दुल लाट ग्रामपंचायत विरोधी एल्गार

अतिक्रमण धारकांचा अब्दुल लाट ग्रामपंचायत विरोधी एल्गार

sakal_logo
By

फोटो
.....


गायरान अतिक्रमणधारकांचा
आज अब्दुललाटमध्ये मोर्चा
अब्दुललाट, ता. २० ः येथील गायरान अतिक्रमणधारकांना ग्रामपंचायतीने दिलेल्या नोटिसीला उत्तर देण्यासाठी सोमवारी (ता. २१) सकाळी दहाला श्रमशक्ती परिवाराच्या पुढाकाराने अतिक्रमणधारकांच्या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. येथील गायरान जमिनीवर गरजू नागरिकांनी बांधलेली घरे व झोपड्या अतिक्रमण म्हणून प्रशासन पाडणार असेल तर यास आंदोलन उभारून ताकदीने विरोध करण्याचा निर्णय आज सायंकाळी येथील बाजारकट्ट्यावर आयोजित केलेल्या अतिक्रमणधारकांच्या बैठकीत घेण्यात आला. श्रमशक्ती परिवाराचे प्रमुख कॉ. आप्पा पाटील यांनी या बैठकीसाठी आवाहन केले होते.
येथील अवचितनगर, जावईनगर, इंदिरानगर, लालनगर, गणेशनगरमध्ये गरजू नागरिकांनी गेल्या २५-३० वर्षांपासून गायरान जमिनीवर आपली घरे अथवा झोपड्या उभारल्या आहेत. उच्च न्यायालयाच्या निकालाचा संदर्भ देऊन शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार ही अतिक्रमणे आठ दिवसांच्या आत काढून घ्यावीत, अशा नोटिसा येथील ग्रामपंचायतीतर्फे या अतिक्रमणधारकांना देण्यात येत आहेत. ग्रामपंचायतीमार्फत गेल्या दोन-तीन दिवसांपासून या भागांमध्ये अतिक्रमण हटविण्यासाठी रिक्षा फिरवून सूचना दिली जात आहे.
दरम्यान, या नोटिसीविरुद्ध संघटित लढा उभारून ताकदीने विरोध करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. बैठकीला मोठ्या संख्येने अतिक्रणधारक उपस्थित होते. दादा मोहिते यांनी प्रास्ताविक केले. या वेळी मोहन कांबळे, सतीश कुरणे, श्रमशक्ती परिवाराच्या कार्यकारी संचालिका कॉ. जयश्री पाटील, प्रशांत कांबळे, श्रीधर कांबळे, आलासकर, पिंटू कांबळे, रुबिना मुजावर, रवींद्र गाडवे आदींनी मत व्यक्त केले. उद्या (ता. २०) सकाळी दहाला मोर्चासाठी माळभागावरील गणेश मंदिर येथे मोठ्या संख्येने एकत्रित जमून ग्रामपंचायतीवर मोर्चा काढण्याचा निर्णय या वेळी कॉ. आप्पा पाटील यांनी जाहीर केला. मीना मुळे यांनी आभार मानले.