ज्येष्ठ नागरिक देशाची संपत्ती - श्री. जगन्नाथ मोरे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ज्येष्ठ नागरिक देशाची संपत्ती - श्री. जगन्नाथ मोरे
ज्येष्ठ नागरिक देशाची संपत्ती - श्री. जगन्नाथ मोरे

ज्येष्ठ नागरिक देशाची संपत्ती - श्री. जगन्नाथ मोरे

sakal_logo
By

ज्येष्ठ नागरिक ही देशाची
संपत्ती ः दीपक जाधव

ऐतवडे खुर्द, ता. ३० ः ज्येष्ठ नागरिक ही देशाची संपत्ती असून त्यांची‌ काळजी घेणे हे समाजाचे कर्तव्य आहे. ज्येष्ठ नागरिकांना समाजाने सन्मान दिला पाहिजे, यासाठी कुरळप पोलिस स्टेशन तुमच्या पाठीशी असल्याचे प्रतिपादन कुरळप पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक जाधव यांनी केले. ज्येष्ठ नागरिक राष्ट्रीय संघटनेचे सांगली जिल्ह्याचे अध्यक्ष जगन्नाथ मोरे पाटील यांनी जाधव यांचा सत्कार केला. त्यावेळी त्यांनी बैठकीत ज्येष्ठ नागरिकांच्या अडीअडचणी व समस्या सोडविण्यासाठी स्वतंत्र ज्येष्ठ नागरिक कक्ष निर्माण करण्यात आले असून महिन्यातून एकदा बैठकीचे आयोजन करावे, असे ठरविण्यात आले. बैठकीदरम्यान सांगली जिल्हा उपाध्यक्ष विजयराव लोंढे, कोषाध्यक्ष हनुमंतराव पाटील, मोहिते व सावंत यांच्यात चर्चा झाली.
येथील ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष तानाजी पाटील, बबनराव शिंदे, सुभाष खराडे, संभाजी पाटील, बी. एस. पाटील, जे. के. पाटील आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Aik22b00657 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..