
परखंदळे येथे गुणवंत विद्यार्थ्यांची रथातून मिरवणूक
गुणवंत विद्यार्थ्यांची
परखंदळेत मिरवणूक
आंबा ता. १९ ः स्कॉलरशिप, प्रज्ञा शोध व एनएमएमएस या परीक्षांमध्ये यश संपादन केलेल्या परखंदळे प्राथमिक शाळेतील बावीस विद्यार्थ्यांची रथातून भव्य मिरवणूक काढण्यात आली.
ग्रामस्थ व केंद्रप्रमुख सदाशिव थोरात यांच्या प्रेरणेतून सजवलेल्या दोन रथांतून धनगरी ढोल, ताशा व लेझीम या पारंपारिक वाद्यांच्या साथीने बांबवडे ते परखंदळे अशी सात किलोमीटर विद्यार्थ्यांची मिरवणूक काढली.
विशाल दळवी, संजीवनी दळवी, आर्यन गावडे, सुशांत यादव, प्रणिता गायकवाड, वैष्णवी पाटील, आर्यन पाटील, ऋषिकेश लव्हटे, मधुरा पाटील, संग्राम पाटील, सौरभ पाटील, अनुराधा पोवार, सायली पोवार, प्राजक्ता लव्हटे, साक्षता लव्हटे, प्रियांका पाटील, श्रृतिक दळवी, ऐश्वर्या गावडे, अवंतिका पाटील, श्रेया सुतार, पायल गावडे व श्रावणी सुतार या विद्यार्थ्यांनी यश मिळविले. मुख्याध्यापक भगवान पाटील, विक्रम पाटील, जमीरइलाई सय्यद यांचे मार्गदर्शन लाभले. कोरोना महामारीचा काळ असूनही एकही दिवस शाळा बंद न ठेवता मार्गदर्शक शिक्षकांनी अध्यापन केले होते. प्रतिवर्षी या शाळेचे विद्यार्थी विविध स्पर्धा परीक्षांमध्ये बाजी मारतात. सुगम बांबवडे भागातील पंधरा विद्यार्थी रिक्षातून शिक्षणासाठी येथे येतात.
शिक्षणाधिकारी आशा उबाळे म्हणाल्या की, ग्रामीण भागात शिक्षणाची ज्ञानगंगा अशी पोहोचली तर एक दिवस परखंदळे हे ज्ञानपीठ व्हायला वेळ लागणार नाही. माजी गटशिक्षणाधिकारी उदय सरनाईक, गटशिक्षणाधिकारी नंदकुमार शेळके, सहाय्यक बीडीओ संदीप कोटकर, सरपंच अश्विनी दळवी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष केशव गावडे, केंद्रप्रमुख सदाशिव थोरात यांची उपस्थिती होती. सुत्रसंचालन रवी सुर्वे यांनी केले. मुख्याध्यापक भगवान पाटील यांनी आभार मानले.