पावनखिंड येथे स्वच्छता मोहीम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पावनखिंड येथे स्वच्छता मोहीम
पावनखिंड येथे स्वच्छता मोहीम

पावनखिंड येथे स्वच्छता मोहीम

sakal_logo
By

००३७१
पणुत्रे उपसरपंचपदी कृष्णात पाटील
पणुत्रे : येथील उपसरंपचपदी नामदेव कृष्णात पाटील यांची बिनविरोध निवड झाली. निवड सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच रंगराव पाटील होते. तत्कालीन उपसरपंच जानकी पाटील यांनी राजीनामा दिल्याने पद रिक्त होते. रिक्त पदावर श्री. पाटील यांची निवड झाली. त्यांचे नाव सदस्य भिकाजी कांबळे यांनी सुचविले. निवडीनंतर सरपंच रंगराव पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार झाला. सभेस सदस्य सतीश पाटील, रघुनाथ कुंभार, अनिता पाटील, रेखा पाटील, सुनीता कुंभार उपस्थित होते.

वारणा शेतकरी संस्था बिनविरोध
देवाळे : येथील वारणा शेतकरी विकास सेवा संस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली. निवड झालेले उमेदवार असे : बाजीराव शामराव ढेरे, सदाशिव पांडुरंग पाटील, बाजीराव सीताराम भारमल, शंकर शामराव पाटील, शिवाजी आकाराम पाटील, आनंदा परशुराम पवार, मोहन आनंदा गराडे, भक्ती बाजीराव ढेरे, दया दत्तात्रय गायकवाड, प्रकाश श्रीपती सराटे, शिवाजी विनायक माने, बाबासो हिंदूराव पाटील. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सौ. माधुरी कुंभार यांनी काम पाहिले.

-----------
02299
राजाराम शिंदे अध्यक्षपदी
गारगोटी : वाघापूर (ता. भुदरगड) येथील महालक्ष्मी विकास सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी राजाराम देवाप्पा शिंदे यांची व उपाध्यक्षपदी रघुनाथ मारुती कांबळे यांची बिनविरोध निवड झाली. एस. एस. पाटील यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले. संस्थापक बाळासाहेब शिंदे, नारायण पाटील, धनाजी कुंभार, श्रीपती आरडे, अमृत कामिरकर, विलास कुंभार, मोहन एकल आदी उपस्थित होते. सचिव राजेंद्र खटांगळे यांनी आभार मानले.

02928
02927
व्यवस्थापन समितीचे बचाटे अध्यक्ष
पुनाळ : कोलोली (ता. पन्हाळा) येथील केंद्रशाळेच्या व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी मनसेचे तालुकाध्यक्ष अमर गोविंद बचाटे व उपाध्यक्षपदी संदीप केरबा पाटील यांची निवड करण्यात आली.बहुसंख्य पालकांच्या उपस्थितीत ही निवड करण्यात आली. स्वागत संजय गावडे, प्रास्ताविक लक्ष्मण पोवार यांनी केले. अन्य सदस्य असे : तात्यासाहेब परीट, संजय सुतार, सौ. सविता माने, सौ. कोमल गुरव, सौ. शिल्पा कांबळे, ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी सौ. जयश्री बचाटे, तज्‍ज्ञ शिक्षक शिक्षक जयसिंगराव गुरव, शिक्षक प्रतिनिधी अनिल आंगठेकर, सचिव लक्ष्मण पोवार. या वेळी सरपंच विश्वास चव्हाण, पी. आर. पाटील, ग्रामस्थ, पालक उपस्थित होते. आभार अजय दाभोळकर यांनी मानले.

२६०३
युगंधरा पाटीलचे यश
शाहूनगर ः बेले (ता. करवीर) येथील विद्यामंदिर शाळेची विद्यार्थिनी युगंधरा पंकज पाटील हिने पहिली ज्ञानदीप प्रज्ञाशोध परीक्षेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला. तिला वर्गशिक्षिका रूपाली माने, एस. डी. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

१४९७
महादेव पाटील अध्यक्षपदी
हळदी ः वाशी (ता. करवीर) येथील श्री वासुदेव विकास सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी महादेव भाऊ पाटील व उपाध्यक्षपदी इंदुबाई दिनकर तिबिले यांची बिनविरोध निवड झाली. अध्यक्षपदासाठी सूचक संभाजी पाटील व अनुमोदक जयसिंग पाटील होते. तर उपाध्यक्षपदासाठी सूचक भरत मोहिते व अनुमोदक संजय चपाले होते. पंचवार्षिक निवडणुकीत जिल्हा बँक माजी संचालिका उदयानी साळुंखे व जिल्हा परिषद माजी अध्यक्ष बाबूराव हजारे यांच्या सत्ताधारी आघाडीने बहुमताने सत्ता कायम राखली. निवडीवेळी नवनिर्वाचित सदस्य आणि संस्थेचे ज्येष्ठ सभासद उपस्थित होते. निवडणूक अधिकारी म्हणून श्री.संदीप पाटील यांनी काम पाहिले.


१४९५
१४९४
सरदार पाटील अध्यक्षपदी
हळदी ः वाशी (ता. करवीर) येथील श्री राम विकास सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी सरदार विलास पाटील व उपाध्यक्षपदी कृष्णात श्रीपती पाटील यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहायक सहकार निबंधक बाळासाहेब पाटील यांनी काम पहिले. भोगावती साखर कारखान्याचे माजी संचालक बी. ए. पाटील यांच्या नेतृत्वाखालील या संस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध होऊन तेरा संचालकांची निवड झाली आहे. नूतन संचालक मंडळामध्ये भीमराव अमृतराव पाटील, महादेव पाटील, केरबा पाटील, पांडुरंग माळी, कुंडलिक पाटील, रंगराव शेळके, दगडू कांबळे, खानू रानगे, नारायण पाटील, द्रौपदी पाटील, पार्वती कुंभार यांचा समावेश आहे. निवडीवेळी भोगावती कारखान्याच्या संचालिका अनिता पाटील, सागर पाटील उपस्थित होते.

पावनखिंडीत स्वच्छता मोहीम
आंबा ः शाहूवाडी ते पावनखिंड शिव दौड व ऐतिहासिक पावनखिंड येथे स्वच्छता मोहीम राबविली. स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने ही मोहीम राबवली. डॉ. झुंजार माने व राजर्षी शाहू करिअर ॲकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी शाहूवाडी ते पावनखिंड अशी वीस किलोमीटरची दौड पूर्ण केली. पावनखिंड परिसरात आढळलेल्या पत्रावळ्या, प्लास्टिकच्या पिशव्या, बाटल्या, पालापाचोळा, कचरा गोळा करून स्वच्छता केली. मोहिमेत दिनकर लोहार, दत्तात्रय पवार, निवास कदम, संदीप पाटील, सचिन चौगुले, प्रवीण पांढरे, जयसिंग डाकवे, योगेश कुलकर्णी, प्रसाद खोत, जय सुतार, शुभम पाटील सहभागी झाले होते. शिव दौडीमध्ये सहभागी सदस्यांना समितीच्या वतीने प्रमाणपत्रे देण्यात आली.

Web Title: Todays Latest Marathi News Ama22b01781 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top