
कडवी नदीतीरावर जागवल्या १० जुलै १७०२ च्या आठवणी
01668
मानोली ः येथील कडवी नदीतीरावर १० जुलै १७०२ च्या आठवणी जागवण्यात आल्या.
कडवी नदीतीरावर जागवल्या
१० जुलै १७०२ च्या आठवणी
सकाळ वृत्तसेवा
आंबा ता. १० ः १० जुलै १७०२ चा दिवस. लाखोंची फौज घेऊन विशाळगडापर्यंत पोहोचलेल्या औरंगजेब बादशहाची कडवी नदीमुळे मोठी नाचक्की झाली होती. याच दिवसाच्या आठवणी आज सत्यशोधक इतिहास अकादमी आणि मोनेरा फाउंडेशनने मानोली येथील कडवी नदीतीरावर जागवल्या.
१७०२ मध्ये बादशहा औरंगजेब स्वराज्याला नेस्तनाबूत करण्याचे स्वप्न घेऊन स्वराज्यामध्ये दाखल झालला होता. पावसाच्या अगोदर कडवी नदी ओलांडून पुन्हा मिरजला कूच करण्याचा सल्ला त्याने धुडकावून लावला होता. तो आपल्या रणनीतीनुसार विशाळगडावरून भर पावसात कडवी नदी ओलांडून मिरजेच्या दिशेने जायला निघाला. परंतु, विशाळगड ते मानोली दरम्यान सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातला मुसळधार पाऊस आणि अवघड वाटा यामुळे तो मेटाकुटीला आला होता. नदी ओलांडून जात असताना त्याचे अतोनात नुकसान झाले होते. औरंगजेबाची कधी नव्हे एवढी नाचक्की या दिवशी झाली होती, अशी नोंद इतिहासात आढळते. सत्यशोधक इतिहास अकादमीचे अध्यक्ष प्रा. सुहास नाईक यांनी अभ्यासाअंती ही माहिती पुढे आणलेली आहे. प्रा. प्रकाश नाईक यांचे व्याख्यान झाले. माजी सभापती बाळासाहेब गद्रे, राजेंद्र लाड, बांबवडेचे सरपंच सागर कांबळे, प्रा. निलेश घोलप, अजिंक्य बेर्डे, प्रा. पांडुरंग बागम उपस्थित होते.
Web Title: Todays Latest Marathi News Ama22b01798 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..