मानोली ओव्हर फ्लो, डेंजर झोन नसलेला धबधबा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मानोली  ओव्हर फ्लो,  डेंजर झोन नसलेला धबधबा
मानोली ओव्हर फ्लो, डेंजर झोन नसलेला धबधबा

मानोली ओव्हर फ्लो, डेंजर झोन नसलेला धबधबा

sakal_logo
By

१६८५

मानोली प्रकल्प ‘ओव्हर फ्लो’
बॅकवॉटरमुळे धबधब्याचे पर्यटकांना आकर्षण
सकाळ वृत्तसेवा
आंबा, ता. १८ ः पावसाच्या संततधारेमुळे मानोली लघुपाटबंधारे प्रकल्प ‘ओव्हर फ्लो’ झाला आहे. धरणाच्या बॅकवॉटरमुळे निर्माण झालेला धबधबा ओसंडून वाहत आहे. वर्षा पर्यटनासाठी धबधबा पर्यटकांना खुणावत आहे. डेंजर झोन नसलेला धबधबा सर्वांनाच आकर्षित करतो.
दाट वनराई आणि हिरव्यागार निसर्गात वाहणाऱ्या धबधब्यात भिजण्यासाठी ‘वीकएण्ड’ गाठून कुटुंबासह यायलाच हवे. पावसाची रिपरिप, बोचरी थंडी आणि भिजतानाची वेगळीच धुंदी अनुभवावयास मिळते. धरणाच्या बॅकवॉटरचे पाणी साठ ते सत्तर फूट खाली कोसळत असल्यामुळे धबधब्याखाली मनसोक्त ‘एन्जॉय’ करता येतो.
तलावावरून खाली नजर टाकल्यास निसर्गाचा खराखुरा आविष्कार पाहावयास मिळतो. वन्य पशु-पक्ष्यांचे आश्रयस्थान असलेले गर्द आणि दाट जंगल डोळ्यांचे पारणे फेडते. आंबा परिसरातला नयनरम्य परिसर पाहून झाल्यानंतर मानोलीच्या धबधब्यात मनसोक्त भिजल्याशिवाय कोणीही माघारी जात नाही. हा धबधबा आंबा गावापासून दोन किलोमीटरवर आहे. आंबा-विशाळगड मार्गावरील दोन किलोमीटरचे अंतर पार केल्यावर वरच्या बाजूला गाड्या लावून किंवा तलावाच्या भरावावरून गाड्या घेऊन धबधब्यापर्यंत जाता येते. मानोली गावातून दुचाकी किंवा चारचाकीनेही जाता येते.

Web Title: Todays Latest Marathi News Ama22b01807 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..