आस्था संस्थेच्या वतीने निराधार अपंगांची आनंदमय दिवाळी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आस्था संस्थेच्या वतीने निराधार अपंगांची आनंदमय दिवाळी
आस्था संस्थेच्या वतीने निराधार अपंगांची आनंदमय दिवाळी

आस्था संस्थेच्या वतीने निराधार अपंगांची आनंदमय दिवाळी

sakal_logo
By

01712
येळाणे : येथे दिव्यांगांना फराळ किट व साहित्याचे वाटप झाले.

आस्थातर्फे ५२ दिव्‍यांगांना फराळ वाटप
आंबा : आस्था अपंग संस्थेच्या वतीने जिल्हा मेडिकल असोसिएशनचे उपाध्यक्ष भरतेश कळंत्रे व नायब तहसीलदार रवींद्र मोरे यांच्या उपस्थितीत ५२ निराधार दिव्‍यांगांना दिवाळी फराळ, कपडे व कृत्रिम साहित्याचे वाटप केले. यावेळी आस्था अपंग संस्थेच्या विविध कल्याणकारी उपक्रमांच्या पोस्टरचे उद्घाटन झाले. दिव्यांगांसाठी असलेल्या शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रशासकीय पातळीवर कटिबद्ध असल्याचे नायब तहसीलदार मोरे यांनी सांगितले. याप्रसंगी एस. एम. पाटील, एन. डी. जामदार, संजय लोकरे, रतन खुटाळे, उषा उबाळे यांनी मनोगत व्यक्त केले. बी. एस. पाटील, लक्ष्मण भेडसे, सुनीता पाटील, अनिल अत्तरकर, अमर पाटील, विनायक वारंग उपस्थित होते. प्रा. बाजीराव वारंग यांनी प्रास्ताविक केले. महादेव कुंभार यांनी सूत्रसंचालन केले. उमेश नांगरे यांनी आभार मानले.