ऋतुजा लटके यांच्या विजयाने शाहूवाडी तालुक्यात आनंदोत्सव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ऋतुजा लटके यांच्या विजयाने शाहूवाडी तालुक्यात आनंदोत्सव
ऋतुजा लटके यांच्या विजयाने शाहूवाडी तालुक्यात आनंदोत्सव

ऋतुजा लटके यांच्या विजयाने शाहूवाडी तालुक्यात आनंदोत्सव

sakal_logo
By

ऋतुजा लटके यांच्या विजयाने
शाहूवाडी तालुक्यात आनंदोत्सव

आंबा ता. ६ ः शाहूवाडी तालुक्याच्या सूनबाई ऋतुजा रमेश लटके या अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या आमदार झाल्याने तालुक्यातील शिवसैनिकांसह स्थानिक ठिकाणी आनंदोत्सव साजरा करण्यात आला. दक्षिणेकडील शेंबवणेपैकी धुमकवाडी, येळवण जुगाई, सरूड, बांबवडे, शाहूवाडी व मलकापूर परिसरात शिवसैनिकांसह लटके यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी केली. लटके यांच्या पोटनिवडणुकीतील एकतर्फी विजयाने लटके कुटुंबीयांकडे अंधेरी पूर्व मतदारसंघाची तिसऱ्यांदा आमदारकीची धुरा आली आहे. त्यांचे पती दिवंगत रमेश लटके यांनी सन २००० च्या पोटनिवडणुकीत शाहूवाडी-पन्हाळा विधानसभा मतदारसंघातून माजी आमदार संजीवनीदेवी गायकवाड व माजी आमदार बाबासाहेब पाटील-सरूडकर यांच्या विरोधात निवडणूक लढविली होती. शाहूवाडी तालुक्यात शिवसेना संघटना बांधणीत त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले होते.