दिव्यांगांकडून ऐतिहासिक पावनखिंडीची स्वच्छता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दिव्यांगांकडून ऐतिहासिक पावनखिंडीची स्वच्छता
दिव्यांगांकडून ऐतिहासिक पावनखिंडीची स्वच्छता

दिव्यांगांकडून ऐतिहासिक पावनखिंडीची स्वच्छता

sakal_logo
By

B01721
आंबा : ऐतिहासिक पावनखिंड येथे दिव्यांगांच्या वतीने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

दिव्यांग बांधवांकडून
ऐतिहासिक पावनखिंडीची स्वच्छता

सकाळ वृत्तसेवा
आंबा ता. २१ : आस्था अपंग संस्थेच्या वतीने ''जगू आनंदें'' उपक्रमांतर्गत संस्थापक प्रा. बाजीराव वारंग यांनी दिव्यांग बांधवांसाठी ऐतिहासिक पावनखिंड, वाघझरा व आंबा या ठिकाणी निसर्ग भ्रमंतीचे आयोजन केले होते. यावेळी दिव्यांगांनी ऐतिहासिक पावनखिंड व वाघझरा येथे प्लास्टिकच्या पिशव्या, बाटल्या, पत्रावळ्या गोळा करून परिसर स्वच्छ केला. मोहिमेत तीस दिव्यांग बांधव व भगिनी सहभागी झाल्या होत्या. याप्रसंगी दिव्यांगांना ''पावनखिंड रणसंग्राम'' कथन करण्यात आला.
प्रणित इंडस्ट्रीजचे बाबुराव सागावकर यांच्या हस्ते मलकापूर येथे निसर्ग भ्रमंतीचा शुभारंभ करण्यात आला. जिल्हा बँकेचे निरीक्षक एन. डी. जामदार, महादेव कुंभार, तेजस गांधी, निखिल पाटील, महेश सुतार, प्रा. शिवाप्पा पाटील, समीर गुरव यांचे सहकार्य लाभले.
माजी उपनगराध्यक्ष प्रवीण प्रभावळकर, कोजिमाशिचे संचालक प्रकाश कोकाटे, विजय कांबळे, संतोष कुंभार, विनायक हिरवे यांनी मनोगत व्यक्त केले. संजय लोकरे, श्रीमंत लष्कर, सुभाष पाटील, बी. एस. पाटील, लक्ष्मण भेडसे, रमेश पाटील यांची उपस्थिती होती.