किल्ले विशाळगडावर छत्रपती शंभूराजांचा  राज्याभिषेक सोहळा

किल्ले विशाळगडावर छत्रपती शंभूराजांचा राज्याभिषेक सोहळा

01763
विशाळगड ः येथे शंभूराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याप्रसंगी शिवशाहीर आकाश चंदेल यांनी मार्गदर्शन केले.

छत्रपती शंभूराजांचा
विशाळगडवर राज्याभिषेक सोहळा
आंबा ता. १७ ः किल्ले विशाळगडला छत्रपती शंभूराजांचा राज्याभिषेक सोहळा झाला. गडावरील पंतप्रतिनिधींच्या राजवाड्यात समारंभ विविध उपक्रमांनी झाला. संत तुकाराम महाराजांचे वंशज शिरीषदादा मोरे व जयाजीराव बाजी मोहिते यांनी भगवंतेश्वर मंदिरात शंभूराजांच्या मूर्तीवर जलाभिषेक केला. मंत्रोच्चार आणि पुष्पवर्षावात राज्याभिषेक सोहळा झाला. ‘हर हर महादेव...’च्या जयघोषात भगवंतेश्वर मंदिर ते राजवाडा दरम्यान राजांची पालखी मिरवणूक निघाली. शिवशाहीर अक्षय चंदेल यांनी शंभूराजांचा पराक्रम मांडला. दरम्यान सकाळी आठ वाजता सामाजिक कार्यकर्ते आबा वेल्हाळ यांनी गडाच्या पायथ्याशी राजांच्या मूर्तीचे पूजन केले. हजारो कार्यकर्त्यांच्या जयघोषाने गड परिसर दुमदुमला. भगवंतेश्वर मंदिर, ग्रामदैवत, राजवाडा, वाघजाई व मुंडा दरवाजा फुलांच्या माळांनी व रांगोळ्यांनी सजवला होता. यावेळी मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके झाली.
स्वराज्यातील मावळ्यांचे वंशज अविनाशदादा पासलकर, सुमित घारे - देशमुख, प्रथमेश बांदल, आदित्य बांदल, वैभव बांदल, प्रतीक्षा बांदल, जयाजीराव मोहिते यांचा सन्मान झाला. समितीचे अध्यक्ष आकाश पवार, उपाध्यक्ष अनिकेत हिरवे, कार्याध्यक्ष रोहीत देसाई व मानसिंग कदम, आकाश घोसाळकर, मानतेश घुंगरे, सूरज इंगवले यांनी नेतृत्व केले. शाहूवाडी पोलिस ठाण्यातर्फे मोठा बंदोबस्त होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com