मानोली येथील  तपासणी नाका उद्या पासून  सुरू होणार

मानोली येथील तपासणी नाका उद्या पासून सुरू होणार

मानोली धरणाजवळील तपासणी
नाका आजपासून सुरू होणार

आंबा, ता. १८ ः मानोलीच्या हद्दीतील मानोली धरणाजवळ उद्यापासून (शुक्रवार) तपासणी नाका सुरू करण्यात येणार आहे.
मानोली हद्दीतील वनसंवर्धन राखीव जंगल क्षेत्रात वन्यजीव संरक्षण अधिनियमानुसार जंगल संरक्षण व व्यवस्थापनाच्या दृष्टीने वनविभागाच्या वतीने तपासणी नाका सुरू करण्यात येणार असल्याचे परिक्षेत्र वन अधिकारी अमित भोसले यांनी सांगितले. यासाठी मोठ्या व मिनी बससाठी तीस रुपये, चारचाकी वाहनांसाठी वीस व दुचाकी व शैक्षणिक सहलीसाठी दहा रुपये, प्रौढ माणसासाठी दहा रुपये व लहान मुलांसाठी पाच रुपये अशी सुधारित दराची आकारणी करण्यात आली. याआधी सुचविलेल्या पर्यटन करात पन्नास टक्के कपात करण्याचा निर्णय घेऊन वनविभागाने हा तपासणी नाका कायम करण्याचा निर्णय घेतला. याबाबत बुधवारी शाहूवाडी येथे वनपरिक्षेत्र कार्यालयात बैठक झाली होती. अध्यक्षस्थानी मानोलीचे सरपंच रामचंद्र पाटील होते.
मिळणाऱ्या करातून निसर्ग पर्यटन विकसित करण्यासाठी प्रेक्षणीय स्थळांची सफाई, संरक्षण, माहिती फलक लावणे, गाईड सेवा देणे यावर खर्च केला जाणार असल्याचे परीक्षेत्र वन अधिकारी भोसले यांनी सांगितले.

चौकट
आंबा ग्रामपंचायतीत जंगल सफारी
व्यावसायिक व्यापाऱ्यांची बैठक

दरम्यान, बुधवारी आंबा ग्रामपंचायतीमध्ये जंगल सफारी व्यावसायिक व व्यापारी यांची बैठक झाली. यामध्ये विशाळगडला जाणाऱ्या भाविकांवर कर लादू नये, जंगलातील प्रेक्षणीय स्थळांवर जाणारे निसर्गप्रेमी, पदभ्रमंती व ट्रेकिंग करणारे पर्यटक यांच्यावर संबंधित ग्रामपंचायतीना विश्वासात घेऊन कर आकारणी करावी अशा अकरा मागण्यांचे निवेदन वरिष्ठांना देण्यात येणार असल्याचे निश्चित झाले. माजी सरपंच अनिल वायकूळ, महेंद्र वायकूळ, नीलेश कामेरकर, बासुजी गद्रे, अमित बेर्डे, कपिल कोलते यांनी मनोगत व्यक्त केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com