करंजोशी संस्कार शिबीर उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

करंजोशी संस्कार शिबीर उत्साहात
करंजोशी संस्कार शिबीर उत्साहात

करंजोशी संस्कार शिबीर उत्साहात

sakal_logo
By

करंजोशीत संस्कार शिबिर उत्साहात
आंबा : करंजोशी येथील राजे शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयात राजर्षी शाहू करिअर अॅकॅडमीतर्फे संस्कार शिबिर झाले. राजर्षी शाहू करिअर अॅकॅडमीचे अध्यक्ष संजय लोकरे म्हणाले, ‘‘विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी संस्कार शिबिरांची गरज आहे.’’ शिबिरात लाठीकाठी, मल्लखांब, तलवारबाजी, दांडपट्टा, कराटे, बोटिंग, जंगल सफर, आसने, वनभोजन, नृत्य नाट्य, व्याख्यान आदी उपक्रम राबविले. याप्रसंगी सुंदर हस्ताक्षर, निबंध, वक्तृत्व, चित्रकला, संगीत खुर्ची, फनी गेम्स, गायन आदी स्पर्धा घेण्यात आल्या. शिबिरात संतोष कुंभार, संभाजी लोहार, हर्षद खैरे, आर. आर. पाटील, डॉ. झुंजार माने, एस. डी. पोतदार, नीलेश पाटील, अमोल घोलप, सचिन मुधाळे, ए. टी. कांबळे, संचालक प्रदीप यादव, अनिल अत्तरकर, गीता अत्तरकर यांनी मार्गदर्शन केले. या वेळी मुंबई पोलिसमध्ये निवड झालेल्या भरत लाड, सुजित काईंगडे, सचिन माने, संदीप पाटील, बाबासो चौगुले, किरण मोरे, सोनाली पिंपळे, कोमल मर्दानी, वैभव नांगरे यांचा सत्कार करण्यात आला. विशाल चौगुले, सागर देसाई, विनोद भोसले, विशाल खामकर, हिंमत दाभाडे, रोहिणी मोरे यांनी परिश्रम घेतले.