
कोल्हापूर : शासकीय योजनांचा लाभ नागरिकांना द्या
असळज : महाराजस्व अभियानातून सर्व शासकीय योजनांचा लाभ नागरिकांना द्यावा, असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले. तिसंगी (ता. गगनबावडा) येथे अभियानाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी राहुल रेखावार होते.
पालकमंत्री पाटील यांनी विविध शासकीय योजनांच्या ३० स्टॉलना भेट देऊन संबंधित विभागांकडून दिल्या जाणाऱ्या योजनांची माहिती घेतली.
जिल्हाधिकारी राहुल रेखावार म्हणाले की, महाराजस्व अभियानांतर्गत सर्व शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी तालुकास्तरावरील सर्वच यंत्रणा शिबिरात आली असून विविध योजना व प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी नागरिकांनी दोनदिवसीय शिबिराचा लाभ घ्यावा.
पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी गावपातळीवरील प्रलंबित वाद, तंटे मिटविण्यासाठी गावचावडी हा जिल्हास्तरावरील उपक्रम प्रायोगिक तत्त्वावर साखरी गावात राबविण्यात येणार असल्याची माहिती दिली.
पालकमंत्री पाटील, जिल्हाधिकारी रेखावार यांच्या हस्ते लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ व प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. महाराजस्व अभियान यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करणारे तिसंगीचे सरपंच बंकट थोडगे, वेतवडेचे सरपंच स्वप्नील शिंदे, निवडेचे सरपंच दगडू भोसले यांचा सत्कार झाला. प्रास्ताविक करवीर उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांनी केले. अतिरिक्त जिल्हाधिकारी किशोर पवार, माजी जि. प. सदस्य डॉ.भगवान पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. माजी जि. प. सदस्य बजरंग पाटील, माजी सभापती संगीता पाटील, माजी उपसभापती पांडुरंग भोसले, गटविकास अधिकारी माधुरी परिट, सहायक पोलिस निरीक्षक रणजित पाटील उपस्थित होते. तहसीलदार डॉ. संगमेश कोडे यांनी आभार मानले.
Web Title: Todays Latest Marathi News Asj22b00181 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..