माजी प्राचार्य आर.डी.वाघरे यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त सदिच्छा समारंभ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

माजी प्राचार्य आर.डी.वाघरे यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त सदिच्छा समारंभ
माजी प्राचार्य आर.डी.वाघरे यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त सदिच्छा समारंभ

माजी प्राचार्य आर.डी.वाघरे यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त सदिच्छा समारंभ

sakal_logo
By

00323
तिसंगी : माजी प्राचार्य आर. डी. वाघरे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सपत्नीक सत्कार करताना पालकमंत्री सतेज पाटील. शेजारी बजरंग पाटील, डॉ.भगवान पाटील, संगिता पाटील, बी. डी. कोटकर व अन्य.

कर्तृत्वान शिक्षक आदर्श
विद्यार्थी घडवितोः सतेज पाटील

असळज, ता. १२ : कर्तृत्वान शिक्षक आदर्श विद्यार्थी घडवितो, असे पालकमंत्री सतेज पाटील यांनी सांगितले. तिसंगी (ता.गगनबावडा) येथे मा. दत्ताजीराव मोहिते पाटील माध्यमिक विद्यालयाचे माजी प्राचार्य आर.डी.वाघरे यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त सदिच्छा समारंभप्रसंगी ते बोलत होते.
माजी जि.प. सदस्य डॉ. भगवान पाटील म्हणाले, की एक विज्ञान विषयाचे शिक्षक म्हणून प्राचार्य वाघरे यांचे कार्य व योगदान मोलाचे असून त्यांनी तालुक्याचे नाव राज्य पातळीवर नेले आहे. डॉ. पाटील यांनी सुरु केलेल्या सतेज अभियानाच्या लोगोचे मंत्री पाटील यांच्या हस्ते अनावरण झाले. प्रास्ताविक माजी सरपंच संजय पाटील यांनी केले. माजी जि. प.अध्यक्ष बजरंग पाटील, माजी सभापती संगिता पाटील, उपसभापती पांडूरंग भोसले, डी. वाय. पाटील साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बी. डी. कोटकर आदीसह ग्रामस्थ, माजी विद्यार्थी उपस्थित होते. आभार अशोक पाटील यांनी मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Asj22b00182 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top