साखरी येथे चावडी सभा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

साखरी येथे चावडी सभा
साखरी येथे चावडी सभा

साखरी येथे चावडी सभा

sakal_logo
By

B00325 (फोटो ओव्हरसेट)
साखरी : येथील चावडी सभेत बोलताना पालकमंत्री सतेज पाटील. शेजारी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, सहायक पोलिस निरीक्षक रणजित पाटील व अन्य.


तंटामुक्त गावासाठी चावडी सभा
असळज, ता. ६ : गावातील तंटे गावपातळीवर मिटून गावात शांतता, सलोखा अबाधित राहावा, गाव गुण्यागोविंदाने राहावे, यासाठी चावडी सभा या अभिनव उपक्रमाची संकल्पना पालकमंत्री सतेज पाटील आणि जिल्हा पोलिस प्रमुख शैलेश बलकवडे यांनी मांडली आहे. साखरी (ता.गगनबावडा) येथे उपक्रमाची सुरुवात झाली. 
गगनबावडा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक रणजित पाटील यांच्या पुढाकारातून गावचावडीची सुरुवात झाली. यावेळी पालकमंत्री पाटील, पोलिस अधीक्षक बलकवडे, जिल्हाधिकारी राहुल रेखावार प्रमुख उपस्थित होते. यावेळी गावातील शेतीच्या हद्दीचे जुने वाद, कौटुंबिक वाद असे एकूण ५ तंटे सामोपचाराने मिटवले. त्यांनी यापुढे कोणताही वाद-विवाद करणार नसल्याची ग्वाही दिली. बी. डी. कोटकर, संचालक मानसिंग पाटील, संगीता पाटील, सरपंच सविता शरद कोटकर, उपसरपंच तानाजी कोटकर, आनंदा कांबळे, संजय सुतार, विमल चौगले, आंबुताई मेंगाणे, शरद कोटकर, पोलिस पाटील कविता चौगले, स्वप्निल साळवी, मानसिंग सातपुते, दिगंबर पाटील, विक्रम परीट आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Asj22b00183 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top