महापुराचा लेखाजोखा : गगनबावडा तालुका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महापुराचा लेखाजोखा : गगनबावडा तालुका
महापुराचा लेखाजोखा : गगनबावडा तालुका

महापुराचा लेखाजोखा : गगनबावडा तालुका

sakal_logo
By

महापुराचा लेखाजोखा
------
गगनबावडा तालुका

सहा कोटी ३६ लाख ७४ हजारांच्या भरपाईचे वाटप
---
सप्टेंबरअखेर अंशतः घर पडझड झालेल्या ७० लाभार्थ्यांना भरपाईची प्रतीक्षा
पंडित सावंत : सकाळ वृत्तसेवा
असळज, ता. २७ : गतवर्षी जुलै २०२१ मध्ये आलेल्या महापुरामुळे गगनबावडा तालुक्यातील आठ हजार ७६१ शेतकऱ्यांचे तीन हजार हेक्टरमधील शेती पिकांचे नुकसान झाले. शेती पीक नुकसान, शेत जमीन नुकसान, दुकानदार, सानुग्रह अनुदान, मृत जनावरे, अंशतः घर व गोठा पडझड यासाठी शासनाकडून तालुक्यासाठी सात कोटी ४१ लाख ८७ हजार ४३८ एवढा निधी प्राप्त झाला. त्यापैकी सहा कोटी ३६ लाख ७४ हजार ९२३ रुपयांचे वाटप झाले आहे. ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये अंशतः घर पडझड झालेल्या ७० लाभार्थ्यांना चार लाख २० हजार शासनाकडून निधीअभावी अद्याप देय आहे.
तालुक्यात कुंभी, धामणी, सरस्वती व रुपणी या नद्या आहेत. जुलैमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यात मोठा महापूर आला. तालुक्यातील अनेक नागरिकांच्या घरात पुराचे पाणी शिरले. अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ठिकठिकाणी झालेल्या भूस्खलनामुळे डोंगर खचून ओढ्याच्या प्रवाहाबरोबर खाली आले. अनेकांच्या शेतातील ऊस, भात, नाचणा, वरी ही पिके गाडली गेली. पुराच्या पाण्याच्या वेगवान प्रवाहामुळे नदीकाठच्या पिकांबरोबर जमिनी तुटून गेल्या. असळज, साळवण या मुख्य बाजारपेठांसह ठिकठिकाणी अनेकांच्या दुकानांत पाणी शिरल्याने दुकानदारांचे मोठे नुकसान झाले.
शासनाकडून तालुक्यास नुकसानीपोटी सात कोटी ४१ लाख ८७ हजार निधी प्राप्त झाला. प्रत्यक्षात पंचनाम्यानुसार सहा कोटी ३६ लाख ७५ हजार रकमेचे वाटप झाले. प्राप्त निधी व पंचनामा रक्कम यात फरक पडल्याने एक कोटी पाच लाख १२ हजार ५१५ एवढी रक्कम शासनास परत करावी लागली. अद्याप ऑगस्ट व सप्टेंबर २०२१ मधील अंशतः घर पडझड झालेले ७० लाभार्थी निधीअभावी नुकसानीपासून वंचित आहेत.
(समाप्त)

कोट
“जून व जुलै २०२१ मधील नुकसानग्रस्तांना सर्व अनुदानाचे वाटप झालेले आहे. शेतकरी व दुकानदार यांच्यासमक्ष पंचनामा करून त्यांची स्वाक्षरी घेऊन आठ दिवसांत पंचनामा यादी ग्रामपंचायतीत प्रसिद्ध केली जाते. पंचनामा पाहूनच नुकसानग्रस्तांनी स्वाक्षरी करावी. जेणेकरून पुन्हा तक्रारीची गरज भासणार नाही.”
– संगमेश कोडे, तहसीलदार, गगनबावडा

दृष्टिक्षेपात नुकसान व वाटप रक्कम
शेती पीक नुकसान : ३ हजार हेक्टर
नुकसानग्रस्त शेतकरी : ८ हजार ७६१
वाटप झालेले नुकसान : ४ कोटी ६७ लाख
परत गेलेला निधी : ५१ लाख २८ हजार
वाढीव वाटप निधी : ७४ लाख ६ हजार
वाढीव परत गेलेला निधी : १ लाख ३५ हजार

शेतजमीन नुकसान
नुकसानग्रस्त शेतकरी : ७५१
वाटप झालेले नुकसान : २३ लाख ३८ हजार
परत गेलेला निधी : १ लाख २३ हजार

दुकानदार : १७६
भरपाई : ४५ लाख ९५ हजार
परत गेलेला निधी : ३९ लाख ५५ हजार

अंशत घर व गोठा पडझड : १३५
भरपाई : ७ लाख ७६ हजार
परत गेलेला निधी : ११ लाख ७ हजार

मृत जनावरे : ८
भरपाई : २ लाख ८ हजार
परत गेलेला निधी : ६० हजार

सानुगृह अनुदान
एकूण पूरग्रस्त : ३३६
वाटप अनुदान : १६ लाख ८० हजार
परत गेलेला निधी : ५ हजार

Web Title: Todays Latest Marathi News Asj22b00187 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top