गगनबावडा तालुक्यात भात रोपलावणीला सुरूवात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गगनबावडा तालुक्यात भात रोपलावणीला सुरूवात
गगनबावडा तालुक्यात भात रोपलावणीला सुरूवात

गगनबावडा तालुक्यात भात रोपलावणीला सुरूवात

sakal_logo
By

00373

भात रोपलावणीला सुरुवात
गगनबावडा तालुक्यातील चित्र; पावसाने दडी मारल्याने उपसा पंप सुरू
पंडित सावंत ः सकाळ वृत्तसेवा
असळज, ता. २९ ः पावसाने दडी मारली असली तरी शेती पंपाद्वारे नदीपात्रातील पाणी उपसा करून गगनबावडा तालुक्यात भात रोप लावणीस सुरुवात केली आहे. तालुक्यात सर्वत्र असे चित्र पाहावयास मिळत आहे.
पावसाच्या आगारात पहिल्या महिन्यातच पावसाने पाठ फिरवली. मे महिन्याअखेरीस पेरणी केलेली भातरोपे लावणीयोग्य झाल्याने पाऊस नसताना रोपलावण करावी लागत आहे. गगनबावडा तालुक्यात लावण पद्धतीने भातपीक घेतले जाते. गादी वाफ्यावर भाताची रोपे तयार केली जातात. त्यासाठी एप्रिल व मे महिन्यामध्ये तरवा तयार केला जातो. मेअखेरीस किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात तरव्यावर भाताची रोपे तयार करण्यासाठी पेरणी केली जाते. साधारणतः तीन आठवड्यांत रोपे लावणीयोग्य झाल्यानंतर भात रोपलावण केली जाते.
बैलजोडींची संख्या कमी झाल्याने पॉवर ट्रीलर, लहान ट्रॅक्टरच्या साहाय्याने चिखल केला जात आहे. मोजक्याच शेतकऱ्यांकडे बैलजोडी आहे. असे शेतकरी चिखलगुठ्ठा पद्धतीने चिखल करतात. गुठ्ठा पद्धतीने चिखल केल्यामुळे जमिनीचे सपाटीकरण होण्यास मदत तर होतेच शिवाय तणांचे प्रमाणदेखील खूप कमी होते.

Web Title: Todays Latest Marathi News Asj22b00209 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..