भुईबावडा, करुळ घाटातील धबधबे प्रवाहित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भुईबावडा, करुळ घाटातील धबधबे प्रवाहित
भुईबावडा, करुळ घाटातील धबधबे प्रवाहित

भुईबावडा, करुळ घाटातील धबधबे प्रवाहित

sakal_logo
By

00391

भुईबावडा, करुळमधील
धबधबे झाले प्रवाहित
वर्षा पर्यटनांची संधी; पर्यटकांची मात्र प्रतीक्षा
पंडित सावंत : सकाळ वृत्तसेवा
असळज, ता. ६ : गगनबावडा व परिसरातील जोरदार पावसामुळे भुईबावडा व करुळ घाटातील पर्वतरांगा हिरव्यागार झाल्या आहेत. भुईबावडा तसेच करूळ घाटातील अनेक लहान-मोठे धबधबे कोसळू लागले असून पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत आहेत. मात्र पर्यटकाविना धबधबे सुनेसुने आहेत.
शहर व जिल्ह्याच्या पूर्व भागात पावसाचा जोर कमी असला तरी कोकण माथ्यावरच्या भुईबावडा, करूळ व गगनबावडा परिसरात चांगला पाऊस सुरू आहे. कोकणातील दऱ्यातून वाऱ्याने वर येणारे ढग पर्यटकांचे विशेष आकर्षण असून हे ढग पावसाची वेगळीच अनुभूती देत असतात. निसर्गाच्या मुक्त उधळणीचा साक्षात्कार पाहावयास मिळणाऱ्या करूळ व भुईबावडा घाट मार्गातील अनेक लहान-मोठे धबधबे प्रवाहित झाले असून ते घाट मार्गात ओसंडून वाहू लागले आहेत. गगनबावडा येथून उत्तर व दक्षिण दिशेने अनुक्रमे भुईबावडा व करूळ हे दोन घाट कोकणात जातात. हिरव्यागार डोंगररांगामुळे घाटांची मनमोहकता वाढली आहे. सारा परिसर हिरवाईने नटला आहे. दरवर्षी वर्षा पर्यटनाने हे दोन्ही घाट फुलून जातात.
गगनबावडा सर्वसामान्यांचे मिनी महाबळेश्वर. येथील दाट धोक्यात कोसळणारा टपोरा पाऊस करूळ व भुईबावडा घाटातून होणारे वर्षा ऋतूचे विलभनीय दृश्य सर्वांनाच मोहीत करते. मात्र घाटात कोसळणाऱ्या लहान मोठ्या धबधब्यांचा आस्वाद घेण्यासाठी सध्या हौशी पर्यटकांच्या प्रतीक्षा आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Asj22b00218 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..