अतिसार नियंत्रण पंधरावडा सुरु | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अतिसार नियंत्रण पंधरावडा सुरु
अतिसार नियंत्रण पंधरावडा सुरु

अतिसार नियंत्रण पंधरावडा सुरु

sakal_logo
By

००३९७
गारीवडे : अतिसार नियंत्रण पंधरवडा उपक्रमांतर्गत प्रशिक्षणप्रंसगी आरोग्य कर्मचारी.

गगनबावडा तालुक्यात
अतिसार नियंत्रण पंधरवडा
असळज, ता. ८ : पावसाळ्यातील बदलत्या हवामानामुळे ० ते ५ वर्षांपर्यंतच्या बालकांत अतिसार होण्याची शक्यता बळावली असून ते त्यांच्या जीवावरही बेतण्याचा धोका आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून गगनबावडा आरोग्य विभागामार्फत १५ जुलैपर्यंत ओआरएस आणि झिंक गोळ्या वाटपाची मोहीम हाती घेण्यात आली आहे. तालुक्यातील ० ते ५ वयोगटांतील २३९२ एवढ्या बालकांना याचा लाभ होणार असल्याची माहिती तालुका आरोग्यधिकारी डॉ. विशाल चोकाककर यांनी दिली.
अतिसारामुळे होणारे बालमृत्यू शून्यावर आणणे, हे उद्दिष्ट समोर ठेवून जिल्ह्यात १ जुलै ते १५ जुलै या कालावधीपासून विशेष अतिसार नियंत्रण पंधरवडा राबविण्यास सुरुवात झाली आहे. जिल्हा परिषदअंतर्गत व पंचायत समिती आरोग्य विभागामार्फत ४२ गावांत आशा स्वयंसेविकांमार्फत हे काम सुरू आहे.
आशा स्वयंसेविका ५ वर्षांच्या आतील बालक असलेल्या प्रत्येक घरास भेट देतील. तसेच ८ ते १० मातांचा गट तयार करून त्यांना ओआरएसचे द्रावण कसे तयार करावे व ते बाळाला कसे द्यावे याबद्दल माहिती देतात. प्रत्येक शाळेत जाऊन आरोग्य कर्मचारी शालेय मुलांना हात धुण्याचे प्रात्यक्षिक दाखवून माहिती सांगतात. अशा पद्धतीने पंचायत समिती गगनबावडा यांच्यामार्फत अतिसार नियंत्रण पंधरवडा राबविला जात आहे.
तालुका आरोग्य अधिकारी चोकाककर, वैद्यकीय अधिकारी डॉ. अजयकुमार गवळी, डॉ. वृषाली कारंडे, डॉ. पूजा भोई, वरिष्ठ औषध निर्माणाधिकारी कार्तिक सातपुते, विस्तार अधिकारी विजय सावंत, अर्जुन इंगळे, ब्लॉक नर्सिंग ऑफिसर आय. व्ही. पुजारी, तालुका समूह संघटक उत्तम पाटील, आरोग्य सेवक आनंद काळे आदी सहभागी झाले होते.

Web Title: Todays Latest Marathi News Asj22b00221 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..