
अणदूर लघुप्रकल्प ओव्हरफ्लो, गगनबावड्यात पावसाची संततधार कायम
00407
अणदूर लघुप्रकल्प ओव्हरफ्लो
गगनबावड्यात संततधार कायम; कुंभी नदी काठास इशारा
असळज, ता. ९ : सोमवारपासून गगनबावडा तालुक्यात सुरू असलेली पावसाची संततधार आजही कायम राहिली. तालुक्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे अणदूर लघु पाटबंधारे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला आहे.
गगनबावड्याचा मिनी लवासा म्हणून ओळखला जाणारा अणदूर येथील लघु प्रकल्प पावसामुळे आज सकाळी १० वाजता पूर्ण क्षमतेने भरला. प्रकल्पाची क्षमता ५.७५ द.ल.घ.मी. इतकी आहे.
आज सकाळी संपलेल्या २४ तासात तालुक्यात सरासरी ७७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गगनबावडा परिसरात ६७ मिलिमीटर तर साळवण परिसरात ८७ मिलिमीटर पाऊस नोंदला गेला. कुंभी प्रकल्प क्षेत्रात १२४ मिलिमीटर तर कोदे प्रकल्प क्षेत्रात ११३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. कुंभी प्रकल्पातून वीजनिर्मितीसाठी ३०० क्युसेक्स तर कोदे प्रकल्पाच्या सांडव्यावरून ८९७ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
तालुक्यातील कोदे, वेसरफ हे दोन लघु प्रकल्प यापूर्वीच भरले आहेत तर आज अणदुर प्रकल्पही भरल्याने कुंभी नदीच्या पातळीत वाढ होणार आहे. नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा पाटबंधारे शाखा कळेचे शाखाधिकारी अजिंक्य पाटील यांनी दिला आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Asj22b00226 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..